Topics

Post Top Ad

Your Ad Spot

Sunday, June 13, 2021

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

साहित्यिकांची टोपण नावे

 

टोपणनाव

लेखक

अनंत फंदी

शाहीर अनंत घोलप

अनंततनय

दत्तात्रय अनंत आपटे

अनिरुध्द पुनर्वसू

नारायण गजानन आठवले

अनिल

आत्माराम रावजी देशपांडे

अमरशेख

मेहबूब पठाण

अज्ञातवासी

दिनकर गंगाधर केळकर

आनंद

वि..बर्वे

आरती प्रभु

चिंतामण त्र्यंबक खानोलकर

काव्यविहारी

धोंडो वासुदेव गद्रे

कुंजविहारी

हरिहर गुरुनाथ कुलकर्णी

कुमुद

..शुक्ल

कुसुमाग्रज

वि.वा.शिरवाडकर

कृष्णकुमार

सेतू माधव पगडी

केशवकुमार

प्र.के. अत्रे

करिश्मा

.रा.फाटक

केशवसुत

कृष्णाजी केशव दामले

गदिमा

.दि.माडगुळकर

गिरीश

शंकर केशव कानेटकर

ग्रेस

माणिक शंकर गोडघाटे

गोल्या घुबड

विष्णुशास्त्री चिपळूणकर

गोविंद

गोविंद त्र्यंबक दरेकर

गोविंदाग्रज

राम गणेश गडकरी

चंद्रिका /चंद्रशेखर

शिवराम महादेव गो-हे

चारुता सागर

दिनकर दत्तात्रय भोसले

छोटा गंधर्व

सौदागर नागनाथ गोरे

बालगंधर्व

नारायणराव राजहंस

जीवन

संजीवनी मराठे

ठणठणपाल/अलाणे-फलाणे

जयवंत दळवी

तुकडोजी महाराज

माणिक बंडोजी ब्रम्हभट्ट

संत तुकाराम

तुकाराम बोल्होबा अंबिले

तुकाराम शेंगदाणे

ज्ञानेश्वर नाडकर्णी

दत्त (कवी)

दत्तत्रय कोंडदेव घाटे

द्या पवार (कवी)

दगडू मारुती पवार

जागल्या (कथालेखक)

दगडू मारुती पवार

दक्षकर्ण

अशोक रानडे

दादुमिया

दा.वि.नेने

दासोपंत

दासोपंत दिगंबर देशपांडे

दिवाकर

शंकर काशिनाथ गर्गे

दिवाकर कृष्ण

दिवाकर कृष्ण केळकर

धनुर्धारी

रा.वि.टिकेकर

धुंडिराज

मो..रांगणेकर

नागेश

नागेश गणेश नवरे

नाथमाधव

व्दारकानाथ माधवराव पितके

निशिगंध

रा.श्री.जोग

नृसिंहाग्रज

.गो.जोशी

पद्मा

पद्मा विष्णू गोळे

पराशंर

लक्ष्मणराव सरदेसाई

पी.सावळाराम

निवृत्ती रावजी पाटील

पुष्पदंत

प्र..जोशी

प्रफुल्लदत्त

दत्तात्रय विष्णू तेंडोलकर

प्रभाकर (शाहीर)

प्रभाकर जनार्दन दातार

फडकरी

पुरूषोत्तम धाक्रस

फरिश्ता

. रा. फाटक

बाकीबा

बाळकृष्ण भगवंत बोरकर

बाबा कदम

वीरसेन आनंद कदम

बाबुराव अर्नाळकर

चंद्रकांत सखाराम चव्हाण

बाबुलनाथ

वि.शा.काळे

बालकवी

त्र्यंबक बापूजी ठोंबरे

बाळकराम (विनोदासाठी)

राम गणेश गडकरी

बी

नारायण मुरलीधर गुप्ते

बी रघुनाथ

भगवान रघुनाथ कुलकर्णी

बंधुमाधव

बंधु माधव मोडक (कांबळे)

भटक्या

प्रमोद नवलकर

भाऊ पाध्ये

प्रभाकर नारायण पाध्ये

भानुदास

कृष्णाजी विनायक पोटे

भानुदास रोहेकर

लीला भागवत

भालचंद्र नेमाडे

भागवत वना नेमाडे

मकरंद

बा.सी.मर्ढेकर

मंगलमूर्ती

मो..रांगणेकर

मनमोहन

गोपाळ नरहर नातू

लोककवी श्री मनमोहन

मीनाक्षी दादरकर

माधव ज्युलियन

माधव त्र्यंबक पटवर्धन

माधवानुज

डॉ. काशिनाथ हरि मोडक

मामा वरेरकर

भार्गव विट्ठल वरेरकर

मधू दारूवाला

.पा.भावे

मिलिंद माधव

कॅ. मा कृ. शिंदे

मुक्ताबाई (संत)

मुक्ताबाई विठ्ठल कुलकर्णी

मोरोपंत

मोरेश्वर रामचंद्र पराडकर

मंडणमित्र

.पा.खंबिरे

यशवंत

यशवंत दिनकर पेंढारकर

यशवंत दत्त

यशवंत दत्ताजी महाडिक

रघुनाथ पंडित

रघुनाथ चंदावरकर

रमाकांत नागावकर(गंधर्व)

बळवंत जनार्दन करंदीकर

रसगंगाधर

गंगाधर कुलकर्णी

राजा ठकार

नारायण गजानन आठवले

राजा मंगळवेढेकर

वसंत नारायण मंगळवेढेकर

राधारमण

कृष्ण पांडुरंग लिमये

रा. . शास्त्री

वि. कानिटकर

रूप

प्रल्हाद वडेर

रे. टिळक

नारायण वामन टिळक

लता जिंतूरकर

लक्ष्मीकांत तांबोळी

लक्ष्मीनंदन

देवदत्त टिळक

लोकहितवादी

गोपाळ हरि देशमुख

वनमाळी

वा.गो.मायदेव

वसंत बापट

विश्वनाथ वामन बापट

वसंत सबनीस

रघुनाथ दामोदर सबनीस

वामन पंडित

वामन नरहर शेखे

विजय मराठे

ना.वि.काकतकर

विंदा करंदीकर

गोविंद विनायक करंदीकर

विनायक

विनायक जनार्दन करंदीकर

विनोबा

विनायक नरहर भावे

विभावरी शिरुरकर

मालतीबाई विश्राम बेडेकर

विष्णुदास

नरहर सदाशिव जोशी

वशा

वसंत हजरनीस

विष्णुबुवा ब्रम्हचारी

विष्णु भिकाजी गोखले

शशिकांत पूनर्वसू

मो.शं.भडभडे

शांताराम

के..पुरोहित

शेषन कार्तिक

आत्माराम शेटये

श्रीधर

ब्रम्हाजीपंत ब्रम्हानंद नाझरीकर

संजीवनी

संजीवनी रामचंद्र मराठे

संजीव

कृष्ण गंगाधर दीक्षित

संप्रस्त

भा.रा.भागवत

सहकरी कृष्ण

कृष्णाजी अनंत एकबोटे

सानिया

सुनंदा बलरामन कुलकर्णी

सार्वजनिक काका

गणेश वासुदेव जोशी

सुधांशु

हणमंत नरहर जोशी

सुमंत

आप्पाराव धुंडिराज मुरतुले

सौमित्र

किशोर कदम

हरफन मौला

अरुण गोडबोले

सुगंधा गोरे

सुखराम हिवलादे

होनाजी बाळा

होनाजी शेलार खाने+ बाळा कारंजकर

ज्ञानदेव (संत)

ज्ञानेश्वर विट्ठलपंत कुलकर्णी

 

मराठी व्याकरण विरामचिन्हे

 

विराम चिन्हांचा वापर भावनांच्या,विचारांच्या आविष्कारासाठी आवश्यक महत्त्वाचा ठरतो. भाषा व्यवहारात लेखन, भाषण , वाचन या क्रिया सतत सातत्याने घडत असतात. जेव्हा आपण लेखन करतो तेव्हा कथन केलेले वाचकांच्या लक्षात यावे म्हणून विरामचिन्हांचा वापर केला जातो. कोणताही मजकूर वाचत असताना लिहलेला अर्थ लक्षात घेऊन आपण थांबतो. या थांबण्याला विराम घेणे असे म्हणतात. हा विराम कधी अल्प असतो तर कधी त्यापेक्षा अधिक असतो. कधी एखादे वाक्य बोलनाऱ्या व्यक्तीच्या मुखातील असतो.

बोलताना किंवा लिहिताना अर्थ नीट लक्षात यावा म्हणून शब्द वाक्ये यांमध्ये काही काळ थांबावे लागते. कोठे किती थांबावे, हे ध्यानात येण्यासाठी जी विशिष्ट चिन्हे वापरतात, तीच विराम चिन्हे होत.

विराम म्हणजे थांबणे. बोलताना आपण आवश्यकतेनुसार कमी अधिक वेळ थांबू शकतो, परंतु लिहिताना तसे करता येत नाही, म्हणून ही थांबण्याची क्रिया विरामचिन्हाव्दारे दर्शवली जाते.

प्रकार

चिन्ह

नियम/ उपयोग

उदा.

पूर्णविराम

(.)

याचा वापर वाक्य पूर्ण झाले की करतात.

1.     आज दसरा आहे.

2.     येथून निघून जा.

3.     रमा ला कन्या प्राप्ती झाली.

स्वल्प विराम

(,)

1.     वाक्यातील शब्द, विभाग किंवा वाक्याचा अंश यांचा वेगळेपणा दाखविण्यासाठी.

2.     मोठे वाक्यांश वेगळे दर्शविण्यासाठी

3.     समान वाक्ये निराळी दाखविण्याकरता.

4.     एकाच वाक्यात दोन पेक्षा अधिक शब्द आले असता.

5.     वाक्यात आरंभी संबोधन आल्यास संबोधनवाचक शब्दापुढे स्वल्पविराम या चिन्हाचा वापर केला जातो.

1.     आम्ही संग्रहालयातील प्राणी, पक्षी, चित्रे, नाणी, ताम्रपट, लिपिप्रकार पहिले.

2.     पावसाच्या आगमनाने सारी सृष्टी आनंदित झाली,कोकिळा गाऊ लागली, गायी हंबरू लागल्या, वासरे बागडू लागली.

3.     विद्यार्थी मित्रांनो , प्रिया म्हणाली, मी आज येणार नाही.

4.     कृष्णाने कोबी, मटार, भेंडी, पालक, मुळा ह्या भाज्या आणल्या.

अर्धविराम

(;)

1.     ज्यांचा परस्पर संबंध नाही असे वाक्यांश जेव्हा मोठ्या वाक्यात येतात तेव्हा त्या निरनिराळ्या वाक्यांशामध्ये अर्धविराम वापरतात.

2.     संयुक्त वाक्यातील समान वाक्ये वेगवेगळी दाखविण्यासाठी.

3.     दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता.

1.     ढग खूप गर्जत होते; पण पाऊस पडत नव्हता.

2.     त्या देशात राजा होता; तरी सत्ता लोकांच्या हाती होती.

3.     वडिलांच्या जिवंतपणी त्या उधळ्या मुलाचे काहीच चालले नाही; परंतु वडिलांच्या निधनानंतर मात्र त्याने आपली सर्वं संपत्ती उधळून टाकली.’

अपूर्णविराम

(:)

वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास.

संगम महाराजांच्या मते पुढील दिवस शुभ आहेत : , १२, १८, २२.

प्रश्नचिन्ह

(?)

1.     याचा वापर प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी करण्यात येतो.

2.     वाक्यात प्रश्न आला असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येते.

1.     रमाची परीक्षा कधी आहे?

2.     सुरेशचे लग्न कधी होणार?

उद्गारवाचक चिन्ह

(!)

उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी वापर होतो.

1.     शाब्बास, असाच अभ्यास कर!

2.     छान, हीच खरी देशसेवा आहे!

अवतरण चिन्ह

(“ ’’) 
(‘ ’)

1.     एखाद्या वाक्यावर जोर द्यावयाचा असल्यास किंवा दुसऱ्याचे विचार अप्रत्यक्षपणे सांगायचे असल्यास ‘ ’ एकेरी अवतरण चिन्ह वापरतात.

2.     एखाद्याच्या व्यक्तीचे तोंडचे शब्द जसेच्या तसे घेतले असता “ ’’ दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर होतो.

1.     अहमदनगर हेऐतिहासिकशहर आहे.

2.     आपली आपण करी स्तुती तो एक मूर्ख ’’ असे समर्थ रामदासस्वामी म्हणतात.

संयोगचिन्ह

(-)

1.     एखाद्या वाक्यावर जोर द्यावयाचा असल्यास किंवा दुसऱ्याचे विचार अप्रत्यक्षपणे सांगायचे असल्यास ‘ ’ एकेरी अवतरण चिन्ह वापरतात.

2.     एखाद्याच्या व्यक्तीचे तोंडचे शब्द जसेच्या तसे घेतले असता “ ’’ दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर होतो.

1.     अहमदनगर हेऐतिहासिकशहर आहे.

2.     आपली आपण करी स्तुती तो एक मूर्ख ’’ असे समर्थ रामदासस्वामी म्हणतात.

अपसरण चिन्ह

(-)

1.     पूर्वी सांगितलेला मजकूर अधिक स्पष्ट करण्यासाठी त्या ओळीत मजकुराच्या मागे पुढे हे चिन्ह वापरतात.

2.     विशेष स्पष्टीकरणार्थ यादी देताना.

1.     भक्तीने वाहिलेली फुले - मग ती कोणतीही असोतदेवाला प्रियच वाटतात.

2.     दशरथाचे पुत्र चारराम, लक्ष्मण, भरत शत्रूघ्न

लेखन करताना विरामचिन्हांचा वापर महत्त्वपूर्ण असा आहे. जर विरामचिन्हे लेखनात आली नाहीत तर लिहिलेला मजकूर समजण्यास अडचण तर येतेच पण अर्थाचा अनर्थ सुद्धा होऊ शकतो. म्हणून लेखन करताना योग्य विरामचिन्हांचा वापर करावा.

मराठी व्याकरण अव्ययांचे प्रकार

शब्दहा वाक्यातील महत्वाचा घटक आहे. कोणत्याही अर्थपूर्ण वर्णसमूहाला शब्द असे म्हटले जाते. शब्दांचे वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण केले जाते. शब्द जातींचे सव्यय आणि अव्यय असे दोन मुख्य प्रकार केले जातात. यांनाच अनुक्रमे विकारी - अविकारी असे म्हटले जाते.

विकारी शब्द :- वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ शब्दात (रुपात) बदल होत नाही त्या शब्दांना अव्यय किंवा अविकारी शब्द (बदल घडणारे) म्हणतात.

नाम, सर्वनाम, विशेषण क्रियापद या सव्यय किंवा विकारी शब्द जाती मानल्या जातात. यातील नाम, सर्वनाम विशेषण यांना विभक्ती, लिंग, वचन पुरुषाचे विकार होतात तर क्रियापदांना काळ अर्थ यांच्या प्रत्ययांनुसार विकार होतात. मात्र अव्ययांना कोणतेही विकार होत नाहीत. त्यात क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी केवलप्रयोगी या अव्ययांचा समावेश होतो.

Marathi Grammar अव्ययांचे प्रकार

यापूर्वी आपण शब्दांच्या विकारी जातींचा त्यांच्या उपप्रकारांचा अभ्यास केला आहे. आता शब्दांच्या अविकारी जातीचा अभ्यास करू.

1.   क्रियाविशेषण अव्यय :

ज्या अव्ययांनी क्रियेच्या कोणत्याही प्रकारचे विशिष्टत्व दाखविले जाते, त्यास क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
क्रियाविशेषणाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

                      i.        तेथे कर माझे जुळतील.

                     ii.        तेथून नदी वाहते.

                    iii.        काल शाळेला सुट्टी होती.

                    iv.        परमेश्वर सर्वत्र आहे.

                     v.        रस्त्यातून जपून चालावे.

                    vi.        तो वाचताना नेहमी अडखळतो.

                   vii.        मी अनेकदा बजावले.

2.   शब्दयोगी अव्यय :

जे अव्यय शब्दाला जोडल्याने त्या शब्दाचा इतर दुसऱ्या शब्दाशी असलेला संबंध दाखविला जातो. त्या अव्ययास शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
शब्दयोगी अव्ययाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे -

                      i.        त्याच्या घरावर कौले आहेत.

                     ii.        टेबलाखाली पुस्तक पडले.

                    iii.        सूर्य ढगामागे लपला.

                    iv.        देवासमोर दिवा लावला.

                     v.        शाळेपर्यंत रस्ता आहे.

3.   उभयान्वयी अव्यय :

दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उभयान्वयी अव्ययाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे -

                      i.        विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली.

                     ii.        आंबा  फणस ही कोकणातील फळे आहेत.

                    iii.        जनतेची सेवा करा म्हणजे जनता तुम्हास निवडून देईल.

                    iv.        तो म्हणाला की, मी हरलो.

                     v.        वैद्याने चांगले औषध दिले पण उपयोग झाला नाही.

4.   केवलप्रयोगी अव्यय :

जी अव्यय बोलणाऱ्याच्या मनातील हर्ष, शोक, आश्चर्य, तिरस्कार, अनुमोदन इत्यादी भाव किंवा वृत्ती दर्शवितात. त्यांना केवलप्रयोगी अव्यये असे म्हणतात.
केवलप्रयोगी अव्ययाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे -

                      i.        अय्या ! इकडे कुठे तू ?

                     ii.        अरेरे ! काय दशा झाली त्याची !

                    iii.        चूप ! एक शब्द बोलू नको.

                    iv.        आहा ! किती सुंदर फुले !

 

शब्दसिद्धी व त्याचे प्रकार

समूह

शब्द

आंब्याच्या झाडाची

आमराई

उतारुंची

झुंबड

उपकरणांचा

संच

उंटांचा, लमानांचा

तांडा

केसांचा

पुंजका, झुबका

करवंदाची

जाळी

केळ्यांचा

घड, लोंगर

काजूंची, माशांची

गाथण

किल्ल्यांचा

जुडगा

खेळाडूंचा

संघ

गाईगुरांचे

खिल्लार

गुरांचा

कळप

गवताचा

भारा

गवताची   

पेंडी, गंजी

चोरांची, दरोडेखोरांची

टोळी

जहाजांचा

काफिला

तार्‍यांचा

पुंजका

तारकांचा

पुंज

द्राक्षांचा

घड, घोस

दूर्वाची

जुडी

धान्याची

रास

नोटांचे

पुडके

नाण्यांची

चळत

नारळांचा

ढीग

पक्ष्यांचा

थवा

प्रश्नप्रत्रिकांचा, पुस्तकांचा

संच

पालेभाजीची

जुडी, गडडी

वह्यांचा

गठ्ठा

पोत्यांची, नोटांची

थप्पी

पिकत घातलेल्या आंब्यांची

अढी

फळांचा

घोस

फुलझाडांचा

ताडवा

फुलांचा

गुच्छ

बांबूचे

बेट

भाकरीची

चळड

मडक्यांची

उतररंड

महिलांचे

मंडळ

लाकडांची, ऊसाची

मोळी

वाघाचा

वृंद

विटांचा, कालिंगडाचा

ढीग

विधार्थ्यांचा

गट

माणसांचा

जमाव

मुलांचा

घोळका

मुंग्यांची

रांग

मेंढयाचा

कळप

विमानांचा

ताफा

वेलींचा

कुंज

साधूंचा

जथा

हरणांचा, हत्तींचा

कळप

सैनिकांची/चे

तुकडी, पलटण, पथक

 

 

विरामचिन्हे व त्याचे प्रकार

·         शब्द कसा तयार झाला आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला आहे यालाच 'शब्दसिद्धी' असे म्हणतात.

·         शब्दांचे खालील प्रकार पडतात.

 तत्सम शब्द :

·         जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बादल न होता आले आहेत त्यांना 'तत्सम शब्द' असे म्हणतात.

·         उदा.  

·         राजा, भूगोल, चंचू, पुष्प, परंतु, भगवान, कर, पशु, अंध, जल, दीप, पृथ्वी, तथापि, कवि, वायु, भीती, पुत्र, अधापि, मति, पुरुष, शिशु, गुरु, मधु, गंध, पिता, कन्या, वृक्ष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव, विद्वान, संत, निस्तेज, कर, जगन्नाथ, दर्शन, उमेश, स्वामि, मंदिर, तिथी, सूर्य, स्वल्प, घृणा, पिंड, कलश, प्रात:क, दंड, पत्र, ग्रंथ, उत्तम,   आकाश पाप, मंत्र, शिखर, सूत्र, कार्य, होम, गणेश, सभ्य, कन्या, देवर्षि, वृद्ध, संसार, प्रीत्यर्थ, कविता, उपकार, परंतु, गायन, अश्रू, प्रसाद, अब्ज, राजा, संमती, घंटा, पुण्य,   बुद्धी, अभिषेक, संगती, श्रद्धा, प्रकाश, सत्कार, देवालय, तारा, समर्थन, नयन, उत्सव, दुष्परिणाम, नैवेध.

 तदभव शब्द :

·         जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येतांना त्यांच्या मूळ रूपात काही बदल होतो त्या शब्दांना 'तदभव शब्द' असे म्हणतात.

·         उदा.    

·         घर, पाय, भाऊ, सासू, सासरा, गाव, दूध, घास, कोवळा, ओळ, काम, घाम, घडा, फुल, आसू, धुर, जुना, चाक, आग, धूळ, दिवा, पान, वीज, चामडे, तहान, अंजली, चोच, तण, माकड, अडाणी, उधोग, शेत, पाणी, पेटी, विनंती, ओंजळ, आंधळा, काय, धुर, पंख, ताक, कान, गाय.

 देशी/देशीज शब्द :

·         महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोलीभाषेमधील वापरल्या जाणार्‍या शब्दांना 'देशी शब्द' असे म्हणतात.

·         उदा.    

·         झाड, दगड, धोंडा, घोडा, डोळा, डोके, हाड, पोट, गुडघा, बोका, रेडा, बाजारी, वांगे, लुगडे, झोप, खुळा, चिमणी, ढेकूण, कंबर, पीठ, डोळा, मुलगा, लाजरा, वेढा, गार, लाकूड, ओटी, वेडा, अबोला, लूट, अंघोळ, उडी, शेतकरी, आजार, रोग, ओढा, चोर, वारकरी, मळकट, धड, ओटा, डोंगर.      

 परभाषीय शब्द :

संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना 'परभाषीय शब्द' असे म्हणतात.

 

1) तुर्की शब्द

·         कालगी, बंदूक, कजाग

2) इंग्रजी शब्द

·         टी.व्ही., डॉक्टर, कोर्ट, पेन, पार्सल, सायकल, स्टेशन, हॉस्पिटल, बस, फाईल, रेल्वे, पास, ब्रेक, कप, मास्तर, फी, बॉल, स्टॉप, ऑफिस, एजंट, टेलिफोन, सिनेमा, सर्कस, पॅंट, बॅट, पोस्ट, तिकीट, ड्रायव्हर, मोटर, कंडक्टर, नंबर, टीचर, सर, मॅडम, पेपर, नर्स, पेशंट, इंजेक्शन, बटन ड्रेस, ग्लास, इत्यादी. 

3) पोर्तुगीज शब्द

·         बटाटा, तंभाखू, पगार, बिजागरी, कोबी, हापूस, फणस, घमेले, पायरी, लोणचे, मेज, चावी, तुरुंग, तिजोरी, काडतुस.

4) फारशी शब्द

·         रवाना, समान, हकीकत, अत्तर, अब्रू, पेशवा, पोशाख, सौदागार, कामगार, गुन्हेगार, फडवणीस, बाम, लेजीम, शाई, गरीब, खानेसुमारी, हजार, शाहीर, मोहोर, सरकारमहिना हप्ता.

·          

5) अरबी शब्द

 

·         अर्ज, इनाम, हुकूम, मेहनत, जाहीर, मंजूर, शाहीर, साहेब, मालक, मौताज, नक्कल, जबाब, उर्फ, पैज, मजबूत, शहर, नजर, खर्च, मनोरा, वाद, मदत, बदल. 

6) कानडी शब्द  

·         हंडा, भांडे, अक्का, गाजर, भाकरी, अण्णा, पिशवी, खोली, बांगडी, लवंग, अडकित्ता, चाकरी, पापड, खलबत्ता, किल्ली, तूप, चिंधी, गुढी, विळी, आई, रजई, तंदूर, चिंच, खोबरे, कणीक, चिमटा, नथ, तांब्या, उडीद, पाट, गाल, काका, टाळू, गादी, खिडकी, गच्ची, बांबू, ताई, गुंडी, कांबळे. 

·          

7) गुजराती शब्द

 

·         सदरा, दलाल, ढोकळा, घी, डबा, दादर, रिकामटेकडा, इजा, शेट. 

8) हिन्दी शब्द

 

·         बच्चा, बात, भाई, दिल, दाम, करोड, बेटा, मिलाप, तपास, और, नानी, मंजूरइमली. 

9) तेलगू शब्द

 

·         ताळा, अनरसा, किडूकमिडूक, शिकेकाई, बंडी, डबी. 

10) तामिळ शब्द

 

·         चिल्ली, पिल्ली, सार, मठ्ठा.

 

उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार

·         वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचाही बोध होतो त्याला 'काळ'असे म्हणतात.

·         काळाचे प्रमुख 3 प्रकार पडतात.

1.    वर्तमान काळ

2.    भूतकाळ    

3.    भविष्यकाळ 

 वर्तमानकाळ :

क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ 'वर्तमानकाळ' असतो.

 

उदा.    

a.     मी आंबा खातो.

b.    मी क्रिकेट खेळतो.

c.     ती गाणे गाते.

d.    आम्ही अभ्यास करतो.

वर्तमानकाळाचे 4 उपप्रकार घडतात.

 

i) साधा वर्तमान काळ

जेव्हा क्रिया ही वर्तमानकाळात घडते तेव्हा त्याला 'साधा वर्तमानकाळ' असे म्हणतात.

 

उदा.    

a.     मी आंबा खातो.

b.    कृष्णा क्रिकेट खेळतो.

c.     प्रिया चहा पिते.

ii) अपूर्ण वर्तमान काळ / चालू वर्तमानकाळ

जेव्हा एखादी क्रिया वर्तमान काळात असून ती अपूर्ण किंवा चालू असे तेव्हा त्या वर्तमान काळाला 'अपूर्ण किंवा चालू वर्तमानकाळ'म्हणतात.

 

उदा.    

a.     सुरेश पत्र लिहीत आहे.

b.    दिपा अभ्यास करीत आहे.

c.     आम्ही जेवण करीत आहोत.

iii) पूर्ण वर्तमान काळ

जेव्हा क्रिया ही वर्तमानकाळातील असून ती नुकतीच पूर्ण झालेली असेल तेव्हा त्याला 'पूर्ण वर्तमानकाळ' असे म्हणतात.

 

उदा.    

a.     मी आंबा खाल्ला आहे.

b.    आम्ही पेपर सोडविला आहे.

c.     विधार्थ्यांनी अभ्यास केला आहे.

iv) रीती वर्तमानकाळ / चालू पूर्ण वर्तमानकाळ

वर्तमानकाळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखविली तर त्याला 'रीती वर्तमानकाळ' असे म्हणतात.

 

उदा.    

a.     मी रोज फिरायला जातो.

b.    प्रदीप रोज व्यायाम करतो.

c.     कृष्णा दररोज अभ्यास करतो.

 भूतकाळ :

जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते. असा बोध होतो तेव्हा त्या काळाला 'भूतकाळ' असे म्हणतात.

 

उदा.    

a.     राम शाळेत गेला.

b.    मी अभ्यास केला.

c.     तिने जेवण केले.

भूतकाळचे 4 उपप्रकार पडतात.

 

i) साधा भूतकाळ

एखादी क्रिया ही अगोदर घडून गेलेली असते व त्या संदर्भात जेव्हा बोलले जाते तेव्हा त्या काळास 'साधा भूतकाळ' असे म्हणतात.

 

उदा.    

a.     रामने अभ्यास केला

b.    मी पुस्तक वाचले.

c.     सिताने नाटक पहिले.

ii) अपूर्ण/चालू भूतकाळ

एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती म्हणजेच त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती तेव्हा क्रियेच्या त्या अवस्थेला 'अपूर्ण भूतकाळ/चालू भूतकाळ' असे म्हणतात.

उदा.    

a.     मी आंबा खात होतो.

b.    दीपक गाणे गात होता.

c.     ती सायकल चालवत होती.

iii) पूर्ण भूतकाळ

एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पुर्णपणे संपलेली असते, असा जेव्हा अंदाज येतो तेव्हा त्याला 'पूर्ण भूतकाळ' असे म्हणतात.

 

उदा.    

a.     सिद्धीने गाणे गाईले होते.

b.    मी अभ्यास केला होता.

c.     त्यांनी पेपर लिहिला होता.

d.    राम वनात गेला होता.

iv) रीती भूतकाळ / चालू पूर्ण भूतकाळ

भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असते. अशा काळाला 'चालू-पूर्ण भूतकाळ' किंवा 'रीती भूतकाळ' असे म्हणतात.

 

उदा.

a.     मी रोज व्यायाम करीत होतो/असे.

b.    ती दररोज मंदिरात जात होती/असे.

c.     प्रसाद नियमित शाळेत जात होता/असे. 

 भविष्यकाळ :

क्रियापदाच्या रूपावरुन जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे, याची जाणीव होते, तेव्हा त्या काळाला 'भविष्यकाळ' असे म्हणतात.

 

उदा.    

a.     मी सिनेमाला जाईल.

b.    मी शिक्षक बनेल.

c.     मी तुझ्याकडे येईन.

i) साधा भविष्यकाळ

जेव्हा एखादी क्रिया पुढे घडणार असेल असा बोध होतो अशा वेळी 'साधा भविष्यकाळ' असतो.

 

उदा.    

a.     उधा पाऊस पडेल.

b.    उधा परीक्षा संपेल.

c.     मी सिनेमाला जाईल.

ii) अपूर्ण / चालू भविष्यकाळ

जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळामध्ये चालू असेल किंवा पूर्ण झाली नसेल तेव्हा त्याला 'अपूर्ण भविष्यकाळ' असे म्हणतात.

 

उदा.    

a.     मी आंबा खात असेल.

b.    मी गावाला जात असेल.

c.     पूर्वी अभ्यास करत असेल.

d.    दिप्ती गाणे गात असेल.

iii) पूर्ण भविष्यकाळ

जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळातील असून ती पूर्ण झाल्याची जाणीव झालेली असते तेव्हा त्याला 'पूर्ण भविष्यकाळ' असे म्हणतात.

 

उदा.    

a.     मी आंबा खाल्ला असेल.

b.    मी गावाला गेलो असेल.

c.     पूर्वाने अभ्यास केला असेल.

d.    दिप्तीने गाणे गायले असेल.

iv) रीती भविष्यकाळ / चालू पूर्ण भविष्यकाळ

जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल, तर त्याला 'रीती/ चालू पूर्ण भविष्यकाळ' असे म्हणतात.

 

उदा.    

a.     मी रोज व्यायाम करत जाईल.

b.    पूर्वी रोज अभ्यास करत जाईल.

c.     सुनील नियमित शाळेत जाईल.

 

विभक्तीचे अर्थ :

1.     कारकार्थ/ कारकसंबंध  

2.     उपपदार्थ  

·         वाक्यातील नाम/सर्वनाम यांचे क्रियापदांशी जे संबंध असतात, त्यांना 'कारकार्थ' असे म्हणतात.  

·         क्रियापदाशिवाय इतर शब्दांशी असलेले जे संबंध असतात त्यांना 'उपपदार्थ' असे म्हणतात.

·         विभक्तीचे मुख्य कारकार्थ 6 आहेत 

1.     कर्ता

2.     कर्म 

3.     करण

4.     संप्रदान

5.     अपादान (वियोग)

6.     अधिकरण 

 

कर्ता -

·         क्रियापदाने दर्शविलेली क्रिया करणारा कोणीतरी असतो, त्यास 'कर्ता' असे म्हणतात. कर्त्यांची विभक्ती केव्हा-केव्हा प्रथमा असते. 

·         प्रथमेचा प्रमुख असते. प्रथमेचा प्रमुख कारकार्थ कर्ता असतो. 

·         उदा. राम आंबा खातो.

कर्म -

·         कर्त्यांने केलेली क्रिया कोणावर तरी घडलेली किंवा घडते हे सांगणारा शब्द म्हणजे 'कर्म' होय. 

·         हे प्रत्यक्ष कर्म असते याची विभक्ती व्दितीया असते. 

·         व्दीतीयेचा प्रमुख कारकार्थ कर्म असतो. 

·         उदा. राम रावणास मारतो.

 

करण –

 

·         वाक्यातील क्रिया ज्या साधनाने घडते त्याला 'करण' असे म्हणतात. 

·         करण म्हणजे क्रियेच साधन.

·         उदा. आई चाकूने भाजी कापते.

·         या वाक्यात कापण्याची क्रिया चाकू या साधनाने होत आहे. म्हणून चाकूने या शब्दांची विभक्ती तृतीया असून तृतीयेचा मुख्य कारकार्थ करण होय.

संप्रदान -

·         जेव्हा क्रिया दानाचा अर्थ व्यक्त करते तेव्हा ते दान (कोणतीही वस्तू) ज्याला करण्यात येते त्या शब्दाला किंवा क्रिया ज्याला उद्देशून घडतात त्या वस्तूला व स्थानाला 'संप्रदान' असे म्हणतात.

·         दान देण्याची क्रिया ज्याच्यावर होते त्याला 'संप्रदान' असे म्हणतात.

·         उदा. मी गुरुजींना दक्षिणा दिली.

·         या वाक्यात दान देण्याची क्रिया गुरुजी या शब्दावर होत असून त्याची विभक्ती चतुर्थी व चतुर्थीचा मुख्य कारकार्थ संप्रदान होय.

1.     आजीने नातीला गोष्ट सांगितली.

2.     गुरुजी मुलांना  व्याकरण शिकवतात.

 

आपदान (वियोग) –

 

·         क्रिया जेथून सुरू होते तेथून ती व्यक्ती व वस्तू दूर जाते म्हणजे क्रियेच्या संबंधाने त्याच्यापासून एखाधा वस्तूचा वियोग दाखविण्याचा असतो त्यास 'अपादान' म्हणतात.

·         उदा. मी शाळेतून आताच घरी आलो.

·         या वाक्यातील शाळेतून या शब्दातून अपादानाचा अर्थ व्यक्त होत असून त्याची विभक्ती पंचमी ही असून पंचमीचा मुख्य कारकार्थ अपादान हा होय. 

·          

अधिकरण (आश्रय/ स्थान) –

 

·         वाक्यातील क्रिया कोठे किंवा केव्हा घडली हे क्रियचे स्थान किंवा काळ दर्शविणार्‍या शब्दांच्या संबंधास 'अधिकरण' असे म्हणतात.

·         उदा. दररोज सकाळी मी शाळेत जातो. 

·         या वाक्यातील सकाळी व शाळेत हे शब्द अनुक्रमे क्रियेचा काळ व शाळेत हे शब्द क्रियेचे स्थळ दर्शवित असून त्यांची विभक्ती सप्तमी ही आहे व त्या सप्तमीचा मुख्य कारकार्थ अधिकारण हे आहे.

 

 उपपदार्थ :

 

·         नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशिवाय इतर शब्दांशी असलेले जे संबंध असतात त्यांना 'उपपदार्थ' असे म्हणतात. 

·         उदा. आमच्या वर्गातील मधुने शाळेचे सुवर्णपदक जिंकले. 

·         वाक्यातील उद्देश: आमच्या वर्गातील मधुने.

·         वाक्यातील विधेय: शाळेचे सुवर्णपदक जिकले.

·         या वाक्यात अधोरेखित केलेले शब्द हे उपपदार्थ आहेत.

 

 सामान्य रूप :

विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी तसेच शब्दयोगी अव्यय लावण्यापूर्वी नाम किंवा सर्वनामाच्या मूळ स्वरुपात जो बद्दल होतो त्याला 'सामान्य रूप' असे म्हणतात.

 

उदा.

1.     घोडा: घोड्यास, घोड्याला, घोड्याने, घोड्याचा.- या सर्व शब्दांमध्ये 'घोड्या' हे सामान्यरूप.

2.     पाणी: पाण्यास, पाण्याला, पाण्याने, पाण्याचा या सर्व शब्दांमध्ये पाण्याहे सामान्यरूप.

 

 पुल्लिंगी नामांचे सामान्यरूप :

1. '' कारान्त पुल्लिंगी नामाचे रूप '' कारान्त होते.

 

उदा.

 

1.     खांब-खांबास,

2.     काळ-काळास

3.     निर्णय-निर्णयास/निर्णयाने 

4.     दोर-दोरास/दोराने

5.     बाक-बाकास/बाकाला.

2. '' कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप 'या' कारान्त होते.

 

उदा.    

1.     घोडा-घोड्यास, घोड्याला 

2.     दोरा- दोर्‍यास, दोर्‍याने

3.     पंखा-पंख्याला, पंख्यास

·         अपवाद: आजोबा, दादा, काका, मामा, राजा, यांचे सामान्यरूप होत नाही.

3. '' कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप 'या' कारान्त होते.

 

उदा.    

1.     धोबी-धोब्याला, धोब्यास 

2.     तेली-तेलीला, तेल्यास

3.     माळी-माळीला, माळ्यास 

·         अपवाद: हत्ती, नंदी, पंतोती, मुनी, ऋषी, भटजी.

4. '' कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप 'वा' कारान्त होते.

उदा.    

1.     भाऊ-भावास, भावाचा

2.     विंचू-विंचवास, विंचवाला 

3.     नातू-नातवाला, नातवास.

5. '' कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप 'या' कारान्त होते.

उदा.    

1.     फडके-फडक्यांचा 

2.     गोखले-गोखल्यांचा 

·         फुले-फुल्यांचा 

6. '' कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप '' कारान्त राहते.

 

उदा.    

1.     किलो-किलोस, किलोला

2.     धनको-धनकोस, धनकोला 

3.     हीरो-हीरोला, हिरोस.

 

 स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप :

1.     '' कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप एकवचनात '' कारान्त होते व अनेकवचनात '' कारान्त होते.

उदा.    

1.     वीट-विटेस, विटेला, विटांना, विटांचा. 

2.     जीभ-जीभेस, जिभेला, जिभांचा, जिभांना

3.     सून-सुनेस, सुनेला, सुनांना, सुनेचा.

2. काही वेळा कारान्त स्त्रीलिंग नामाचे सामान्यरूप कारान्त होते.

 

उदा.    

 

1.     भिंत-भिंतीस, भिंतीला, भिंतीचा

2.     विहीर-विहिरीस, विहिरीला

3.     पाल-पालीस, पालीला 

3. '' कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप कारान्त होते.

 

उदा.    

1.     शाळा-शाळेत, शाळेस, शाळेला.

2.     भाषा-भाषेत, भाषेस, भाषेचा.

3.     विधा-विधेस, विधेला, विधेचे 

4. '' कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एकवचनात '' कारान्त व अनेकवचनात कारान्त किंवा कारान्त होते.

 

उदा.    

 

1.     भक्ती-भक्तीने 

2.     नदी-नदीस 

3.     स्त्रि-स्त्रिस, स्त्रिया, स्त्रियांचा 

4.     बी-बीस, बियांचा

5.     दासी-दसींचा, दासीला

6.     पेटी-पेटीस, पेटीला.

5. '' कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप होत नाही. क्वचित ते 'वा' कारान्त होते.

 

उदा.    

1.     ऊ-ऊवास, उवाला

2.     काकू-काकूस, काकूला.

3.     सासू, सासुला, सासवांना.

6. '' कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप एकवचनात होत नाही व अनेकवचनात '' कारान्त होते.

 

उदा.    

1.     बायको-बायकांना, बायकांचा.

 

 नपुंसकलिंगी नामांचे सामान्यरूप:

 

1. '' कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप '' कारान्त होते.

 

उदा.    

1.     मूल-मुलास, मुलाला, मुलांना

2.     पान-पानास, पानाला, पानांना

2. '' कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप याकारान्त होते.

 

उदा.    

1.     पाणी-पाण्यात, पाण्याचा

2.     मोती- मोत्यात, मोत्याचा

3.     लोणी-लोण्यात, मोण्याचा 

3. '' कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप '' कारान्त होते.

 

उदा.

1.     लिंबू-लिंबास, लिंबाचे

2.     कोकरू-कोकारास, कोकराचे

4. काही वेळा '' कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप 'वा' कारान्त होते.

 

उदा.    

1.     कुंकू-कुंकवास, कुंकवाचा

2.     गडू-गडवास, गडवाचा 

5. '' कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप 'या' कारान्त होते.

 

उदा.

1.     तळे-तळ्यात, तळ्याला

2.     केळे-केळ्याची, केळ्याचे

3.     खोके-खोक्यात, खोक्याला 

4.     डोके-डोक्यात, डोक्याला

 

 विशेषणाचे सामान्यरूप :

1. '' कारान्त '' कारान्त व '' कारान्त विशेषणाचे सामान्यरूप होत नाही.

 

उदा.    

1.     जगात गरीब माणसांना कोणी विचारात नाही.

2.     त्याचे लोकरी कपड्यांचे दुकान आहे.

3.     मला कडू कारल्याची भाजी आवडते.

2. '' कारान्त विशेषणांचे सामान्यरूप 'या' कारान्त होते.

 

उदा.    

1.     भला माणूस-भल्या माणसास 

2.     हा मुलगा-ह्या मुलास 

3.     खरा माणूस-खर्याु माणसाला.

 

केवल प्रयोगी अव्यय व त्याचे प्रकार

 

1. कालवाचक :


कालवाचक अव्ययवाचे दोन प्रकार पडतात.
अ) कालदर्शक - पावेतो, नंतर, आधी, पुढे, पूर्वी इ.
उदा. 1. आजपावेतो मी आंबा खाल्ला नाही.
2. 
यापुढे मी जाणार नाही.
3.
सकाळनंतर मी तिकडे जाणार आहे.
ब) गतिवाचक - पासून, पर्यंत, मधून, खालून, आतून इ.
उदा.1. कालपासून माझी परीक्षा सुरू झाली.
2.
उद्या पर्यंत ते दुकान बंद राहील.

2. स्थलवाचक :

आत, बाहेर, अलीकडे, पलीकडे, मध्ये, समोर, जवळ, ठायी, पाशी, समक्ष, समीप, नजीक इ.

उदा. 1. पुस्तक टेबलाजवळ ठेवले आहे.
2.
घरामध्ये मोठा साप घुसला आहे.

3. कारणवाचक :

करवी, योगे, हाती, व्दारा, कडून, मुळे इ.

उदा. 1. सावलीमुळे कपडे लवकर वाळत नाही.
2.
सिंहाकडून हरिण मारले गेले.

4. हेतुवाचक :

करिता, साठी, कारणे, अर्थी, प्रीत्यर्थी, निमित्त, स्तव इ.

उदा. 1. यश मिळविण्याकरिता मेहनत लागते.
2.
जगण्यासाठी अन्न हवेच.

5. व्यतिरेकवाचक :

विना, शिवाय, खेरीज, परवा, वाचून, व्यतिरिक्त

उदा. 1. तुझ्याशिवाय माला करमत नाही.
2.
त्याच्या खेरीज दूसरा कोणताही चालेल.

6. तुलनात्मक :

पेक्षा, तर, तम, मध्ये, परिस इ.

उदा. 1. माणसांपेक्षा मेंढरं बारी.
2.
गावामध्ये केशर सर्वात हुशार आहे.

7. योग्यतावाचक :

समान, सम, जोगा, सारखा, योग्य, प्रमाणे इ.

उदा. 1. तो ड्रेस माझा सारखा आहे.
2.
आम्ही दोघे समान उंचीचे आहोत.

8. संग्रहवाचक :

सुद्धा, देखील, ही, पण, केवळ, फक्त,इ.

उदा. 1. मी देखील त्या कार्यक्रमात सहभागी होईल.
2.
रामही भक्तासाठी धावून येईल.

9. कैवल्यवाचक :

, ना, मात्र, पण, फक्त, केवळ इ.

उदा. 1. विराटच आपला सामना जिंकवेल.
2.
किरण मात्र आपल्या सोबत येणार नाही.

10. संबंधवाचक :

विशी, विषयी, संबंधी इ.

उदा. 1. देवाविषयी आपल्या मनात फार भक्ति आहे.
2.
त्यासंबंधी मी काहीच बोलणार नाही.

11. संबंधवाचक :

संगे, सह, बरोबर, सकट, सहित, निशी, सवे, समवेत इ.

उदा. 1. त्याने सर्वांबरोबर जेवण केले.
2.
आमच्या सह तो पण येणार आहे.

12.विनिमयवाचक :

बद्दल, एवजी, जागी, बदली इ.

उदा. 1. त्याच्या जागी मी खेळतो.
2.
सूरजची बदली पुण्याला झाली.

13. दिकवाचक :

प्रत, प्रती, कडे, लागी इ.

उदा. 1. या पेपरच्या दहाप्रत काढून आण.
2.
त्याच्याकडे पैसे दिले आहेत मी.

14. विरोधवाचक :

विरुद्ध, वीण, उलटे, उलट इ.

उदा. 1. भारताविरुद्ध आज पाकिस्तानची मॅच आहे.
2.
त्याने उलट माझीच माफी मागितली.

15. परिणामवाचक :

भर

उदा. 1. मी दिवसभर घरीच होतो.
2.
राम रात्रभर शेतात पाणी भरत होता.

 

सर्वनाम व त्याचे प्रकार

1. हर्षदर्शक : अहाहा, वाहवा, वा, अहा, वा-वा, ओ-हो
उदा. अहाहा! किती सुंदर दृश्य आहे.

2. शोकदर्शक : आई ग, अगाई, हाय, हायहाय, ऊं, अं, अरेरे
उदा. अरेरे! खूप वाईट झाले.

3. आश्चर्यदर्शक : , ओहो, अबब, अहाहा, बापरे, , अरेच्या
उदा. अबब! केवढा मोठा साप

4. प्रशंसादर्शक : छान, वाहवा, भले, शाब्बास, ठीक, फक्कड खाशी
उदा. शाब्बास! तू दिलेले काम पूर्ण केलेस.

5. संमतीदर्शक : ठीक, जीहा, हा, बराय, अच्छा
उदा. अछा! जा मग

6. विरोधदर्शक : छेछे, अहं, ऊं, हू, हॅट, छट, छे,
- 
उदा. छे-छे! असे करू नकोस.

7. तिरस्कारदर्शक : शी, शु, शिक्क, इश्श, हुडत, हुड, फुस, हत, छत, छी
उदा. छी! ते मला नको

8. संबोधनदर्शक : अग, अरे, अहो, , अगा, अगो, बा, रे
उदा. अहो! एकलत का ?

9. मौनदर्शक : चुप, चुपचाप, गप, गुपचुप
उदा. चुप! जास्त बोलू नको

 

वचन व त्याचे प्रकार

1. पुरुषवाचक सर्वनाम :

याचे तीन उपप्रकार पडतात.

1. प्रथम पुरुष : मी, आम्ही, आपण, स्वत: इ

  उदा. 1. मी गावाला जाणार.

        2. आपण खेळायला जावू.

2 .व्दितीय पुरुष : तो, तुम्ही, आपण, स्वतः इ

     उदा. 1. आपण कोठून आलात?

            2. तुम्ही घरी कधी येणार?

3. तृतीय पुरुष : तो, ती, ते, त्या, आपण, स्वतः इ.

    उदा. 1. त्याने माला कामाला लावले पण स्वतःमात्र आला नाही.

          2. त्या सर्वजण इथेच येत होत्या.

2. दर्शक सर्वनाम :

कोणतीही जवळची किंवा वा दूरची वस्तु दर्शविण्यासाठी दर्शक सर्वनामाचा उपयोग करतात.

 उदा. हा, ही, हे, तो, ती, ते.

 उदा. 1. ही माझी वही आहे

  2. हा माझा भाऊ आहे.

3. ते माझे घर आहे.

4. तो आमचा बंगला आहे.

3. संबंधी सर्वनाम :

वाक्यात पुढे येणार्‍या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखविणार्‍या सर्वनामाला संबंधी सर्वनामे असे म्हणतात.

उदा. जो, जी, जे, ज्या

ही सर्वनामे मिश्र वाक्यातच येतात.

ही सर्वनामे गौणवाक्याच्या सुरवातीलाच येतात.

असे गौण वाक्य हे गौण वाक्याचे विशेषण हे प्रकार असते.

  उदा .1. जे चकाकते ते सारेच सोने नसते.

2. जो तळे राखील तो पाणी चाखील.

4. प्रश्नार्थक सर्वनाम :

ज्या सर्वनामांचा प्रश्न विचारण्यासाठी वापर होतो. त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे असे म्हणतात.

  उदा. कोण, कुणास, काय, कोणी, कोणाला

  उदा. 1. तुझे नाव काय?

2. तुला कोणी संगितले.

3. कोण आहे तिकडे.

5. सामान्य / अनिश्चित सर्वनाम :

कोण, काय, कोणी, कोणास, कोणाला, ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहे ते निश्चित सांगता येत नाही तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे म्हणतात.

  उदा. 1. त्या पेटीत काय आहे ते सांग.

2. कोणी कोणास हसू नये.

3. कोण ही गर्दी !

6. आत्मवाचक सर्वनाम :

आपण व स्वतःह्यांना आत्मवाचक सर्वनामे म्हणतात. हे सर्वनाम वाक्याच्या सुरवातीला कधीच येत नाही.

  उदा. 1. मी स्वतःत्याला पहीले.

2. तू स्वतः मोटर चालवशील का?

3. तो आपण होवून माझ्याकडे आला.

4. तुम्ही स्वतःला काय समजतात.

मराठीत मूळ 9 सर्वनाम 

मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतःया मूळ सर्वनामापैकी लिंगानुसार बदलणारी तीन सर्वनाम आहेत - तो, हा, जो.

1. तो- तो, ती, ते

2. हा- हा, ही, हे

3. जो-जो, जी, जे

वचनानुसार बदलणारी पाच सर्वनामे :

मूल सर्वनामापैकी वचनानुसार बदलणारी पाच सर्वनामे आहेत. - मी, तू, तो, हा, जो इ

1. मी- आम्ही

2. तू- तुम्ही

3. तो- तो, ती, ते (एकवचनी) ते, त्या, ती (अनेकवचनी)

4. हा- हा, ही, हे (एकवचनी) हे, ह्या, ही (अनेकवचनी)

5. जो- जो, जी, जे (एकवचनी) जे, ज्या, जी (अनेकवचनी)

 

प्रयोग व त्याचे प्रकार (Voice And Its Types):

वाक्यातील कर्ता, कर्म, व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात.

मराठीत प्रयोगाचे तीन प्रकार पडतात.
1. कर्तरी प्रयोग 
2. कर्मणी प्रयोग 
3. भावे प्रयोग 

1. कर्तरी प्रयोग (Active Voice) : जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग किवा वाचनानुसार बदलत असेल तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग (Active Voice) असे म्हणतात.
उदा . तो चित्रा काढतो. (कर्ता- पुल्लिंगी) 
       ती चित्र काढते. (कर्ता- लिंग)
       ते चित्र काढतात. (कर्ता- वचन)

कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात.
1. सकर्मक कर्तरी प्रयोग 
2. अकर्मक कर्तरी प्रयोग 

1. सकर्मक कर्तरी प्रयोग : ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असेल तेव्हा त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
उदा . राम आंबा खातो.
       सीता आंबा खाते. (लिंग)
       ते आंबा खातात. (वचन)


2. अकर्मक कर्तरी प्रयोग : ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म आलेले नसते तेव्हा त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
उदा . राम पडला 
       सिता पडली (लिंग)
       ते पडले (वचन)    


2. कर्मणी प्रयोग (Passive Voice) : क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किवा वचनानुसार बदलते तर त्यास कर्मणी प्रयोग (Passive Voice) असे म्हणतात.
उदा . राजाने राजवाडा बांधला. (कर्म- पुल्लिंगी)
       राजाने कोठी बांधली. (कर्म- लिंग)
       राजाने राजवाडे बांधले. (कर्म- वचन)


कर्मणी प्रयोगाचे पाच उपप्रकार पडतात.
1. प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग  
2. नवीन कर्मणी प्रयोग 
3. समापन कर्मणी प्रयोग 
4. शक्य कर्मणी प्रयोग 
5. प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग

1. प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग : हा प्रयोग मूल संस्कृत कर्मणी प्रयोगापासून तयार झालेला आहे तसेच या कर्माच्या उदाहरनातील वाक्य संस्कृत मधील कवीरूपी आढळतात.                
उदा. नळे इंद्रास असे बोलीले.
      जो - जो किजो परमार्थ लाहो.


2. नवीन कर्मणी प्रयोग :  ह्या प्रयोगात इंग्लिश मधील Passive Voice प्रमाणे वाक्याची रचना आढळते. तसेच वाक्याच्या सुरवातीला कर्म येते व कर्त्या कडून प्रत्यय लागतात.
उदा . रावण रमाकडून मारला गेला.
       चोर पोलिसांकडून पकडला गेला.


3. समापण कर्मणी प्रयोग : जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ क्रिया समाप्त झाल्यासारखा असतो तेव्हा त्यास समापण कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा . त्याचा पेरु खाऊन झाला.
       रामाची गोष्ट सांगून झाली.


4. शक्य कर्मणी प्रयोग : जेव्हा कर्मणी प्रयोगतील वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा असतो, दिसतो तेव्हा त्या प्रयोगास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा . आई कडून काम करविते.
       बाबांकडून जिना चढविता.


5. प्रधान कर्तुत कर्मणी प्रयोग : कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्ता प्रथम मानला जातो तेव्हा त्या प्रयोगास प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा . त्याने काम केले. 
       तिने पत्र लिहिले.  


3. भावे प्रयोग : जेव्हा कर्त्याच्या किवा कर्माच्या लिंग किवा वाचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास भावे प्रयोग असे म्हणतात.
उदा . सुरेशने बैलाला पकडले.
       सिमाने मुलांना मारले.    

भावे प्रयोगाचे तीन उपप्रकर पडतात. 

1. सकर्मक भावे प्रयोग :
2. अकर्मक भावे प्रयोग :
3. अकर्तुक भावे प्रयोग :

1. सकर्मक भावे प्रयोग : ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असल्यास त्यास सकर्मक भावे प्रयोग म्हणतात.
उदा. शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकविले.
      रामाने रावणास मारले.

2. अकर्मक भावे प्रयोग : ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले नसल्यास त्यास अकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात.
उदा . मुलांनी खेळावे.
       विद्यार्थांनी जावे.

3. अकर्तुक भावे प्रयोग : भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्ता आलेला नसेल तेव्हा त्यास अकर्तुक भावे प्रयोग असे म्हणतात.
उदा . आता उजाडले.
       शांत बसावे.
       आज सारखे उकडते.

 

 

No comments:

Post a Comment

Most View

Post Top Ad

Your Ad Spot

Pages