Topics

Post Top Ad

Your Ad Spot

Sunday, June 13, 2021

भारतीय इतिहास

भारतीय इतिहास

·         स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल माऊंट बॅटन होते.

·         स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल राजगोपालचारी होते.

·         भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू होते. 

·         भारताचे पहिले राष्ट्राध्यक्ष राजेंद्रप्रसाद होते. 

·         26 ऑक्टोबर 1947 रोजी काश्मीर संस्थानाचे विलिनीकरण झाले. 

·         20 फेब्रुवारी 1948 रोजी जुनागड संस्थानाचे विलिनीकरण झाले.
 

·         17 सप्टेंबर 1848 रोजी हैद्राबाद संस्थानाचे विलिनीकरण झाले. 

·         भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी भरली. 

·         डॉ. राजेंद्रप्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. 

·         घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. 

·         26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्विकृत करण्यात आली. 26 जानेवारी 1950 रोजी तीची अंमलबजावणी सुरू झाली.

·         घटना समितीचे कार्ये 2 वर्षे 11 महिने 18 दिवस चालले.

  • इ.स. 1948 मध्ये भाषावार प्रांत रचना करण्यासाठी दार समिती नेमण्यात आली. 

  • 'दार समितीने' भाषावार प्रांतरचना घातक ठरेल असे नमूद केले. 

  • तेलगू भाषा बोलणार्‍याचा आंध्र प्रदेश निर्माण व्हावा यासाठी श्री. पोट्टू श्रीरामलू यांनी आमरण उपोषण केले. 

  • आंध्र प्रदेश हे प्रथम राज्य 1 ऑक्टोबर 1953 रोजी अस्तित्वात आले. 

  • राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना 22 मार्च 1953 रोजी करण्यात आली. त्याचे अध्यक्ष-श्री फाजल. अली होते. 

    सदस्य- के. एम. पंनीकर  हृदयनाथ कुंझरू हे होते. 

  • केंद्र सरकारने फाजल अली कामिशनच्या अहवालानुसार राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 संमत केला. 

  • 1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले. 

  • 1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. 

  • 1971 मध्ये बांग्लादेश मुक्तीसाठी भारताने प्रयत्न केले. 

  • 1975 मध्ये देशात आणिबाणी लावण्यात आली. 

  • 1977 मध्ये बिगर काँग्रेसी पहिले जनता दलाचे सरकार केंद्रात आले. 

  • 1984 मध्ये इंदिरा गांधीची हत्या केली गेली. 

  • 1991 राजीव गांधीना मानवी बॉम्बने ठार मारले गेले.

सामाजिक संघटना व संस्थापक बद्दल माहिती

·         समाजसुधारक - संस्था व समाज 

·         रमाबाई रानडे - सेवासदन-पुणे 

·         पंडिता रमाबाई - शारडासदन-मुंबई, मुक्तिसदन-केडगाव, आर्य महिला समाज-पुणे

·         गोपाळ कृष्ण गोखले - भारत सेवक समाज 

·         कर्मवीर भाऊराव पाटील - रयत शिक्षण संस्था, ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज, युनियन बोर्डिंग हाऊस. 

·         महात्मा गांधी - हरिजन सेवक संघ

·         महर्षि विठ्ठल रामजी शिंदे - डिप्रेस्ड क्लास मिशन, राष्ट्रीय मराठा संघ. 

·         डॉ. शिवाजीराव पटवर्धन - जगदंबा कुष्ठ निवास. 

·         डॉ. आत्माराम पांडुरंग - प्रार्थना समाज.

महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे मुद्दे

·         महाराष्ट्रातील नेवासे,चांदोली, सोमगाव,टेकवाडे, सावरदे व दायमाबाद इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत. 

·         महाराष्ट्रातील महापाषाण  युगाचा काळ इ.स.पूर्व 1000 वर्षापूर्वीचा आहे. 

·         मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर महाराष्ट्रात सातवाहन राजघराण्याचा उदय झाला.

·         जागतिक नकाशावर महाराष्ट्रास सर्वप्रथम दर्शवणारे व महत्व प्राप्त करून देणारे 'सातवाहन' हेच पहिले महाराष्ट्रातील राजघराणे होय. 

·         'सिमुक' हा राजा सातवाहन घराण्याचा संस्थापक मानला जातो. 

·         सातवाहन 'राजा सातकर्णी' प्रथम व त्याची रानी 'नागणिका' यांची प्रतिमा जुन्नरच्या नाणेघाटात आढळून येते. 

·         चालुक्य हे वैष्णवपंथी होते, तरीही त्यांनी धर्मसंहिष्णुतेचे धोरण राबविले होते. 

·         इ.स. 753 च्या दरम्यान चालुक्य घराण्याच्या र्हासानंतर 'दंतीदुर्ग' याने राष्ट्रकूट घराण्याची स्थापना केली. 

·         राष्ट्रकूट  घराण्यातील 'कृष्ण प्रथम' याने जगप्रसिद्ध असलेले 'वेरूळ येथील कैलास मंदिर' बांधले . 

·         शिलाहारांची महाराष्ट्रात दक्षिण कोकण, उत्तर कोकण (ठाणे) आणि कोल्हापूर या तीन ठिकाणी सत्ता केंद्रे होती. 

·         शिलाहार घराण्याचा संस्थापक म्हणून 'विद्याधर जीमुतवाहन' हा असून उस्मानाबाद जिल्ह्यातील तगर(तेर) हे त्याचे मूल स्थान होय. 

·         चंद्रपुर येथे गोंड घराण्याने आपली सत्ता निर्माण केली तसेच या घराण्याचा संस्थापक 'कोल भिल' हा होता.

·         यादवांचा प्रधान हेमाद्री याने 'चातुरवर्ग चिंतामणी' हा ग्रंथ लिहिला. 

·         अल्लाउद्दीन खिलजी याने 1296 मध्ये देवगिरीवर स्वारी केली.

·         महाराष्ट्रात बहामणी राज्याची स्थापना 'हसन गंगू बहामणी' याने केली तो या राज्याचा संस्थापक मानला जातो. 

·         बहामणी राज्याचे पुढील पाच तुकडे झाले -

1.    वर्हाडी-इमादशाही

2.    अहमदनगर-निजामशाही

3.    बिदर-बरीदशाही

4.    गोवलकोंडा-कुतुबशाही

5.    विजापूर-आदिलशाही

·         विजापूरची आदिलशाही राज्याची युसुफ अदिलशाह याने 1489 मध्ये स्थापना केली.

  • गुरु नानक' हे शीख धर्माचे संस्थापक मानले जातात. 

  • गुरु गोविंदसिंग नांदेड मध्ये मुक्कामी असताना इ.स.1708 मध्ये दोन पठांनांकडून त्यांची हत्या झाली.

  • 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला. 

  • 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट झाली. 

  • 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. 

  • 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपति शिवाजी महाराजांचे रायगडावर निधन झाले. 

  • 1761 मध्ये तिसरे पानीपतचे युद्ध घडून आले. 

  • 1802 मध्ये इंग्रज आणि मराठे यांच्यात वसईचा तह होऊन मराठ्यांनी तैनाती फौज स्वीकारली. 

  • शिवाजी महाराजांनी जमीन मोजण्यासाठी एक काठी तयार केली होती तिला 'शिवशाही काठी' असे म्हटले जात असे. 

  • शिवाजी महाराजांनी दोन नाणी सुरू केली होती त्यामध्ये 'होन' हे सोन्याचे तर 'शिवराई' हे तांब्याचे नाणे होते. 

  • दक्षिण भारतामध्ये 'नायनार आणि अलवार' या भक्ती चळवळी उदयास आल्या. 

  • महाकवी सूरदास यांनी 'सुरसागर' हे काव्य लिहिले. 

  • शिलाहार राजे प्रथम राष्ट्रकूटाचे व नंतर चालुक्य व यादवांचे अंकित झाले. चालुक्य राजा दुसर्या पुलकेशीने आपला मुलगा चंद्रादित्य यास सामंत म्हणून 630 च्या सुमारास नेमले व चांदोर सध्याचे चंद्रपुर ही आपली राजधानी बनवली. 

  • 23 जून 1757 च्या प्लासीच्या युद्धात बंगालच्या नवाबचा पराभव करून ब्रिटीशांनी बंगालमध्ये आपली सत्ता निर्माण केली. 

  • 1818 मध्ये मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली.
  • इंग्रजांनी उमजी नाईकांच्या विरोधात पहिला जाहीरनामा 1826 साली काढला. 

  • उमजी नाईक व त्याचा साथीदार पांडुजी याला पकडण्यासाठी रु.100/- चे बक्षीस जाहीर केले. 

  • उमाजी नाईकांचा जुना शत्रू बापुसिंग परदेशी याने इंग्रजांना सहकार्य करून नाईकांना पकडून देण्यास मदत केली. काळू व नाना यांनी विश्वासघाताने उमाजिला पुण्याच्या मुळशिजवळ अवळसा येथे आणून पकडून देण्यास मदत केली. 

  • नानाने उत्तोळी येथे 15 डिसेंबर 1831 रोजी उमाजीला पकडले आणि इंग्रजांच्या स्वाधीन केले.

  • 3 फेब्रुवारी 1834 रोजी उमजी नाईकाला फाशी देण्यात आली. 

  • कोळी  जातीच्या लोकांनी 1828 मध्ये मुंबई विभागात ब्रिटीशांविरोधी रामजी भांगडियाच्या नेतृत्वाखाली उठाव केला. 

  • पुणे जिल्ह्यात 1839 मध्ये कोळी जमातीच्या लोकांनी उठाव केला. 

  • ब्रिटिश राजवटीविरुद्ध सर्वात मोठा उठाव म्हणून 1857 च्या उठावाकडे पाहिले जाते.

  • स्वातंत्र्य वीर सावरकरांनी 1857 च्या उठावास  पहिले स्वातंत्र्य समर असे म्हटले आहे. तर इतिहासकार न.र. फाटक यांनी शिपायांची भाऊगर्दी असे संबोधिले आहे. 

  • सातार्याचे छत्रपति प्रतापसिंग यांचे गेलेले राज्य परत मिळण्यासाठी रांगो बापुजी यांनी 1857 च्या उठावाच्या वेळी खूप प्रयत्न केले. 

  • 1857 च्या उठावाच्या वेळी 31 जुलै 1857 रोजी कोल्हापुरात इंग्रजांविरुद्ध उठाव झाला. 

  • नाशिक जिल्ह्यातील पेठ या ठिकाणी कोळ्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला यामध्ये पेठचा राजा भगवंतराव नीलकंठ राव हा प्रमुख होता. 

  • 13 जून 1957 रोजी नागपूरमधील लोकांनी 1857 च्या उठावात भाग घेवून इंग्रजांविरुद्ध उठाव केला. 

  • 1857 साली महाराष्ट्रात पुणे व अहमदनगर जिल्ह्यामध्ये दख्खनचे दंगे घडून आले. हे दंगे म्हणजे शेतकर्यांनी सावकारविरुद्ध केलेले उठाव होत. 

  • वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म 4 नोव्हेंबर,1845 रोजी कुलाबा जिल्ह्यातील 'सिरधोण' येथे झाला. 

  • गणेश वासुदेव जोशी यांनी समाजामध्ये ऐक्य ,समन्वय निर्माण व्हावा म्हणून 'ऐक्यवर्धणी' ही संस्था स्थापन केली. व त्याच वेळी पुण्यात 1874 'पुना नेटीव्ह इन्स्टिट्यूशन' ही शाळा सुरू केली.

  • 20 फेब्रुवारी, 1889 नंतर वासुदेव बळवंत फडके यांनी रामोशी, कोळी,महार आणि मुसलमान इत्यादी लोकांच्या मदतीने पुणे जिल्ह्याच्या परिसरात दरोडे घालण्यास सुरुवात केली.

1857 चा उठावाचे स्वरूप

 स्वातंत्र्य युद्ध - म्हणणारे व्यक्ती

वि.दा. सावरकर -

·         स्वधर्म रक्षणार्थ व राजकीय स्वातंत्र्यासाठी केलेले स्वातंत्र्य युद्ध होय.

संतोषकुमार रे -

·         हा उठाव म्हणजे लष्करी अथवा सरंजामी उद्रेक अथवा धार्मिक उद्रेकातून निश्चितपणे अधिक काहीतरी होता.

कर्नल मानसयन -

·         'परिस्थितीने दाखवून दिले की, हिंदी समाजात व्देष भावना निर्माण करणारी अनेक कारणे होती हि कारणे वैयक्तिक नसून राष्ट्रीय स्वरूपाची होती'.

डॉ. एस.एन. सेन -

·         'धर्मयुद्ध म्हणून सुरुवात झालेल्या घटनेने शेवटी स्वातंत्र्य युद्धाचे स्वरूप धरण केले.'

 

बंड म्हणणारे व्यक्ती

 

सर जॉन लॉरेन्स -

·         'बंडाचे मुळ लष्करात होते. त्यांचे मूळ कारण काडतूस प्रकरण होते दुसरे तिसरे कोणतेच करण नव्हते'

सर जॉन सिले -

·         'उठाव पूर्णत:देशप्रेम भावनारहित आणि स्वार्थाने प्रेरित शिपायांचे बंड होते ज्याचा कोणी नेता आणि जनपाठींबा नसणारे होते.'

न.र. फाटक -

·         'शिपायांची भाऊगर्दी'

आर.सी. मुजूमदार -

·         इ.स. 1857 च्या उठावास राष्ट्रीय चळवळ म्हणता येणार नाही बंड करणारे नेते राष्ट्रीय भावनेने अपरिचित असलेले दिसतात.

डॉ. ईश्वरी प्रसाद -

·         'उत्तरेतील बंड'

  • भारताचा पहिला व्हॉईसरॉय लॉर्ड कॅनिंग झाला. 

  • राणी एलिझाबेथच्या काळात स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया कंपनीची 1857 साली राणी व्हिक्टोरियाच्या कारकिर्दीत इतिश्री (शेवट) झाला. 

  • इ.स. 1860 मध्ये भारतीय संस्थानिकांना कॅनिंगने सनदा दिल्या.

  • इ.स. 1861 साली प्रत्येक प्रांतात पोलिस खाते निर्माण करून त्यावर इंस्पेक्टर जनरल यापदाची निर्मिती करण्यात आली. 

  • 1837 साली लॉर्ड मेकॉलेने तर केलेल्या 'इंडियन पिनल कोड' ला 1860 मध्ये मान्यता देण्यात आली. 

  • इ.स. 1861 मध्ये 'इंडियन हायकोर्ट अॅक्ट' पारीत केला गेला व त्यान्वये मुंबई, चेन्नई व कोलकात्ता या शहरात उच्च न्यायालयांची स्थापना करण्यात आली. 

  • 'चार्लस वुड' ने सुचविलेल्या सुचनेनुसार लॉर्ड कॅनिंगने प्रत्येक प्रांतात शिक्षणखाते सुरू केले. तसेच मुंबई, चेन्नई व कोलकात्ता येथे विद्यापीठे स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले.

  • इ.स. 1859 साली शेतकर्‍याविषयीचा 'बंगाल रेंट अॅक्ट' कॅनिंगच्या काळात करण्यात आला. 

  • इ.स. 1860 मध्ये झालेल्या कृषक आंदोलनाच्या मूळ कारणांचे वर्णन 'निल दर्पण' या नाटकात केले. त्याचे इंग्रजी भाषांतर बंगालचा लेफ्टनंट ग्रांट याने केले. 

  • लॉर्ड कॅनिंगची कारर्किर्द 1862 ला पूर्ण झाली. राणीने त्यास 'अर्ल' हा किताब बहाल केला. 

  • इ.स. 1866-67 मध्ये ओरिसात दुष्काळ पडला होता त्याचे निर्मूलन करण्यासाठी 'फॅमिना कमीशन' ची नियुक्ती सर जॉन लॉरेन्स याने केली. 

  • व्हाईसरॉय लॉर्ड मेयोने भारतात पहिल्यांदा आर्थिक विकेंद्रीकरणाची सुरुवात केली. 

  • 14 डिसेंबर 1870 रोजी एक ठराव पास करून त्यानुसार वित्तविकेंद्रीकरणाची योजना निश्चित करण्यात आली. या ठरावास 'प्रांतीय स्वायत्तेची सनद' असे मानण्यात येते. 

  • लॉर्ड मेयोच्या काळात इ.स. 1872 मध्ये शिरगणतीचे (जणगणना) कार्य सुरू झाले.

म.गांधीची कामगिरी (1869 ते 1948)

·         जन्म 2 ऑक्टोबर 1869 - पोरबंदर (गुजरात) 

·         इंग्लंडमधून बॅरिस्टरची पदवी घेतली. 

·         1893 ते 1914 - दक्षिण आफ्रिकेत कार्ये

·         गांधीजीचे राजकीय गुरु - गोपाळ कृष्ण गोखले. 

·         गांधीजी जानेवारी 1915 मध्ये भारतात परत आले. 

·         1917 मध्ये म.गांधींनी आपल्या सत्याग्रह अस्त्राचा देशात पहिला प्रयोग केला. 

·         पहिल्या महायुद्धात बिनशर्त मदत केल्या बद्दल त्यांना कैसर-ए-हिंद हि पदवी मिळाली. 

·         1917 - चंपारण्यात सत्याग्रह (निळ कामगारांचा सत्याग्रह) 

·         1918 - खेडा सत्याग्रह (सारा माफीची मागणी) 

·         1918 - अहमदाबाद गिरणीतील संप 

·         1920 - असहकार चळवळीस प्रारंभ केला. 

·         1924 - बेळगांव काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष 

·         1930 - सविनय कायदेभंगाची चळवळ 

·         1933 - 'हरिजन सेवक संघाची' स्थापना, यंग इंडिया साप्ताहिक सुरू केले.

·         1933 - 'हरिजन' हे दैनिक सुरू केले.

·         1940 - वैयक्तिक सत्याग्रह

·         1942 - 'चलेजाव' ची घोषणा

·         1948 - 30 जानेवारी गांधीजीची हत्या

·         दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांनी 'इंडियन ओपिनियन' हे वृत्तपत्र काढले.

भारत स्वातंत्र्याचा इतिहास

·         1945 सालच्या ऑगस्ट महिन्यात दुसरे महायुध्द थांबले. त्यात इंग्लंडला विजय मिळाला खरा परंतु युध्दामुळे इंग्लंडची आर्थिक हानी व मनुष्य हानी फार मोठया प्रमाणावर झाली. त्यामुळे इंग्लंडची शक्ती कमी झाली.

·         तशातच सर्वसामान्य भारतीय जनता आणि भारतीय सैनिक यांच्यावरील ब्रिटीश सत्तेचा दरारा नाहीसा झाल्याची जाणीव ब्रिटिश राज्यकत्र्यांना झाल्यामुळे भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय इंग्लंडने घेतला.

·         दुसरे महायुध्द संपता संपताच इंग्लंडमध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली. विन्स्टन चर्चिल यांचे सरकार जाऊन क्लेमंट अ‍ॅटली यांच्या नेतृत्वा खालील मजूर पक्षाचे सरकार अधिकारावर आले.

·         भारताला शक्य तितक्या लवकर स्वातंत्र्य देण्याचा मानस पंतप्रधान अ‍ॅटली यांनी जाहिर केला.

·         तसेच तीन ब्रिटिश मंत्र्यांचे एक शिष्टमंडळ भारताच्या भवितव्याबाबत भारतीयांशी वाटाघाटी करण्यासाठी पाठवत असल्याचेही त्यांनी घोषित केले.

त्रिमंत्री योजना :-

·         मार्च 1946 मध्ये इंग्लंड चे त्रिमंत्री मंडळ भारतात आले.

·         र्लॉड पेथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स व अलेक्झांडर हे या मंडळाचे सदस्य होते.

·         भारताबाबतची इंग्लंडची योजना त्यांनी भारतीय नेत्यांपुढे मांडली.

·         तिला 'त्रिमंत्री योजना' असे म्हणतात.

·         ब्रिटिशांच्या शासना खालील प्रांत व संस्थाने यांचे मिळून भारतीय संघराज्य स्थापन केले जावे, या संघराज्याचे संविधान भारतीयांनीच तयार करावे, हे संविधान तयार होईपर्यंत भारताचा राज्यकारभार व्हाइसरॉयच्या सल्ल्याने भारतीयांच्या हंगामी सरकारने करावा असे या योजनेचे स्वरूप होते.

·         या योजनेतील काही तरतुदी राष्ट्रीय सभेला मंजूर नव्हत्या.

·         तसेच मुस्लिमांचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची तरतूद या योजनेत नाही म्हणून लीगही असंतुष्ट होती.

·         यामुळे त्रिमंत्री योजना पूर्णत: मान्य झाली नाही.

 वाढते अराजक :-

·         त्रिमंत्री योजनेनुसार संविधान समिती स्थापन करण्यासाठी जुलै 1946 मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली. राष्ट्रीय सभेला त्यात प्रचंड बहुमत मिळाले.

·         संविधान समितीत सहभागी होण्यास लीगने नकार दिला. पाकिस्तानच्या निर्मितीची मागणी जोराने पुढे मांडण्यास लीगने सुरूवात केली. इतकेच नव्हे तर सनसदशीर मार्ग सोडून पाकिस्तानच्या निर्मितीसाठी हिंसाचाराचा मार्ग पत्करण्याचा मानस लीगने जाहिर केला.

·         या मार्गावरील पहिले पाऊल म्हणून 16 ऑगस्ट, 1946 हा प्रत्यक्ष कृतिदिन म्हणून घोषित केला.

·         लीगच्या या निर्णयानुसार 16 ऑगस्ट रोजी लीगच्या अनुयायांनी लुटालुट, जाळपोळ, सशस्त्र हल्ले यांचे सत्र सुरू केले. कोलकता शहरात तर रस्तोरस्ती चकमकी झाल्या.

·         त्यात केवळ तीन दिवसांत चार हजार लोक मृत्युमुखी पडले.

·         बंगाल प्रांतातील नोआखालीच्या भागात भीषण हत्या झाल्या.

·         हा राक्षसी हिंसाचार थांबवण्यासाठी वयाची पंचाहत्तरी ओलांडलेले गांधीजी बंगालच्या दौर्‍यावर गेले.

·         जातीय दंगलीचा भयानक वणवा पेटलेला असताना प्राणाची पर्वा न करता गावोगावी पदयात्रा करत लोकांची मने त्यांनी शांत केली.

·         परंतु देशातील परिस्थिती चिघळतच गेली.

·         देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात हिंसाचाराचे थैमान चालूच राहिले.

·         देशात असुरक्षिततेचे, तणावाचे व दहशतीचे वातावरण वाढत गेले.

हंगामी सरकारची स्थापना :-

·         अशा अराजकाच्या परिस्थितीत गव्हर्नर जनरल र्लॉड वेव्हेल यांनी भारतीय प्रतिनिधींचे हंगामी सरकार स्थापन केले.

·         पंडित जवाहरलाल नेहरूच्या नेतृत्वा खालील मंत्रिमंडळाने राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली.

·         सुरूवतीला हंगामी सरकारमध्ये सामील होण्यास लीगने नकार दिला होता. परंतु तो निर्णय बदलून ऑक्टोबरमध्ये लीगचे सदस्य हंगामी सरकारमध्ये सामील झाले.

·         मंत्रिमंडळात शिरून अडवणुकीचे धोरण स्वीकारावे आणि हंगामी सरकारला कामकाज करणे अशक्य करावे. असा लीगचा निर्धार होता.

·         यामुळे मंत्रिमंडळात सतत खटके उडू लागले. सरकारचे कामकाज ठप्प होऊ लागले.

·         देशातील वाढत्या अराजकाला व हिंसाचाराला आवर घालणे हंगामी सरकारला जड जाऊ लागले. राजकीय तणाव पराकोटीला गेला.

·         'भारतावरील आपला ताबा इंग्लंड जून 1948 पूर्वी सोडून देईल', असे ब्रिटिश पंतप्रधान अ‍ॅटली यांनी जाहिर केले.

·         त्याचबरोबर भारताच्या राज्यकारभाराची सूत्रे भारतीयांच्या हाती लवकर सोपवण्यासाठी र्लॉड माउंटबॅटन यांची नेमणूक भारताचे नवे गव्हर्नर जनरल म्हणून केल्याचेही त्यांनी घोषणा केले.

  माऊंटबॅटन योजना :-

·         मार्च 1947 मध्ये र्लॉड लुई माउंटबॅटन भारतात आले.

·         त्यांनी सर्व प्रमुख भारतीय नेत्यांशी बोलणी केली त्यानंतर भारताची फाळणी करून भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांच्या निर्मितीची योजना त्यांनी तयार केली.

·         भारतीय फाळणी होण्याची कल्पना भारतीयांना दु:सह होती. देशाचे ऐक्य हा तर राष्ट्रीय सभेच्या भूमिकेचा मूळ आधार होता.

·         परंतु पाकिस्तानच्या निर्मितीचा अट्टहास लीगने धरला. त्यासाठी हिंसाचाराचे थैमान देशात सुरू केले.

·         यामुळे फाळणी शिवाय देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही अशी राष्ट्रीय सभेची खात्री झाली.

·         अतिशय नाइलाजाने फाळणीचा निर्णय राष्ट्रीय सभेला मान्य करावा लागला.

भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा :-

·         माउंटबॅटन योजनेच्या आधारे भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 18 जुलै, 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने मंजूर केला.

·         15 ऑगस्ट, 1947 रोजी भारताने विभाजन होऊन भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात येतील, त्यानंतर त्यांच्यावर ब्रिटिश पार्लमेंटचा कोणताच अधिकार राहणार नाही, अशी तरतूद या कायद्याने केली.

स्वातंत्र्याची घोषणा :-

·         नवी दिल्ली येथील संसद भवनाच्या भव्य सभागृहात 14 ऑगस्टच्या रात्री भारताच्या संविधान समितीची बैठक सुरू होती.

·         मध्यरात्री बाराचे ठोके पडले आणि भारताचे पारतंत्र्य संपले. भारत स्वतंत्र झाला. ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरवण्यात आला.

·         त्याच्या जागी भारताचा तिरंगी ध्वज फडकवण्यात आला. वर्षानुवर्षांच्या गुलामगिरीच्या शृंखला गळून पडल्या.

·         ब्रिटिश सत्तेने भारतात पाय रोवल्यापासून ज्या लक्षावधी भारतीयांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी असीम त्याग केला होता, अनेकांनी आपले प्राण वेचले होते त्यांच्या महान त्यागाची ही फलश्रुती होती.

·         या ऐतिहासिक क्षणाचे महत्व स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या प्रभावी भाषणात उलगडून दाखवले.

·         ते म्हणाले, 'अनेक वर्षांपूर्वी आपण नियतीशी एक करार केला होता. आज त्याची पूर्तता, पूर्णपणे नसली तरी बर्‍याच मोठया प्रमाणात आपण करत आहोत.

·         मध्यरात्रीचा ठोका पडेल तेव्हा सारे जग झोपलेले असताना स्वतंत्र व चैतन्यमय भारत जन्माला येईल.

·         या मंगल क्षणी केवळ भारतीयांच्याच नव्हे तर सर्व मानवजातीच्या सेवेला वाहून घेण्याची शपथ घ्यावी, असे त्यांनी आवाहन केले लक्षावधी भारतीयांनी स्वातंत्र्याचा सोहळा अभूतपूर्व उत्साहाने साजरा केला.

·         स्वातंत्र्यप्रातीचा हा उत्कट आनंद निर्भळ मात्र नव्हता.

·         देशाची फाळणी आणि त्या वेळी उफाळलेला भयानक हिंसाचार यामुळे भारतीय जनता दु:खी होती. स्वातंत्र्य सोहळयात सहभागी व्हायला गांधीजी दिल्लीत थांबले नव्हते.

·         शांतता व जातीय सलोखा टिकवण्यासाठी ते बंगालमध्ये जिवाचे रान करत होते.

·         भारत स्वतंत्र करण्यासाठी अहर्निश झटलेल्या या महात्म्याची स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच निर्घृण हत्या करण्यात आली.

·         ही हत्या नथुराम गोडसे याने 30 जानेवारी, 1948 रोजी केली.

·         हिंदु-मुस्लिम ऐक्य टिकवण्यासाठी गांधीजींनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती व त्यासाठीच त्यांनी आपल्या प्राणाचेही मोल दिले.

भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले :-

·         भारताचे संविधान तयार करण्याचे काम संविधान समितीने 1947 साली सुरू केले.

·         या समितीत डॉ. राजेंद्रप्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, श्यामाप्रसाद मुखर्जी यांसारखे ज्येष्ठ राष्ट्रीय पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बॅ. जयकर यांच्यासारखे प्रख्यात कायदेपंडित; तसेच सरोजिनी नायडू, हंसाबेन मेहता यांसारख्या कर्तबगार महिलाही होत्या.

·         संविधान समितीने तयार केलेले संविधान 26 जानेवारी, 1950 रोजी अमलात आले.

·         ब्रिटिश साम्राज्यवादाविरुध्द लढताना स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता व लोकशाही या मूल्यांवरील निष्ठा भारतीयांनी उराशी बाळगल्या होत्या.

·         या मूल्यांच्या पायावरच आपल्या संविधानाची उभारणी झाली.

संस्थानांचे भारतात विलीनीकरण :-

·         भारतावरील ब्रिटिश सत्तेचा शेवट होताच भारतातील संस्थाने स्वतंत्र होतील अशी तरतूद भारताच्या स्वातंत्र्याच्या कायद्यात केली होती.

·         संस्थानांनी स्वतंत्र राहायचे की भारत किंवा पाकिस्तान यांपैकी एका राज्यात विलीन व्हायचे हा निर्णय त्यांनी घ्यायला होता.

·         संस्थाने स्वतंत्र राहिली तर भारत शेकडो तुकडयांत विभागला जाणार होता. देशाची एकात्मता व सुरक्षितताही धोक्यात येणार होती.

·         संस्थानी प्रजा मात्र भारतात सामील होण्यास उत्सुक होती.

·         या पेचातून त्या वेळचे गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी अतिशय मुत्सद्दीपणे मार्ग काढला.

·         भारतात सामील होणे संस्थानिकांच्या कसे हिताचे आहे हे त्यांनी संस्थानिकांना पटवून दिले.

·         तसेच संस्थानिकांच्या प्रतिष्ठेला व मानमरातबाला धक्का लावला जाणार नाही असे आश्वासनाही त्यांनी दिले.

·         भारत सरकारशी करार करून संस्थानिकांनी फक्त संरक्षण, परराष्ट्रीय संबंध आणि दळणवळण या बाबी भारत सरकारच्या हाती सोपवाव्यात असे त्यांनी सुचवले.

·         याला संस्थानिकांनी मान्यता दिली. जूनागड, हैदराबाद व काश्मीर सोडून बहुतेक सर्व संस्थाने 15 ऑगस्ट, 1947 पूर्वी भारतात विलीन झाली.

·         जूनागडचे विलीनीकरण :-

·         जूनागड हे सौराष्ट्रातील एक लहानसे संस्थान होते.

·         तेथील प्रजेला भारतात सामील व्हायचे होते, तर जूनागडचा नवाब मात्र पाकिस्तानात सामील होण्याच्या विचारात होता.

·         त्याच्या या निर्णयाला प्रजेने कसून विरोध केला. तेव्हा नवाब पाकिस्तानात निघून गेला.

·         त्यानंतर फेब्रुवारी 1948 मध्ये जूनागड भारतात विलीन झाले.

काश्मीरची समस्या :-

·         काश्मीर संस्थानचा राजा हरीसिंग याने स्वतंत्र राहण्याचे ठरवले होते.

·         काश्मीर पाकिस्तानात सामील करून घेण्याचा पाकिस्तानचा मानस होतो.

·         यासाठी पाकिस्तान हरिसिंगावर दडपण आणू लागले.

·         ऑक्टोबर 1947 मध्ये तर पाकिस्तानच्या चिथावणीने सशस्त्र घुसखोरांनी काश्मीरवर हल्ला केला.

·         तेव्हा भारतात सामील होण्याच्या करारावर हरीसिंगाने स्वाक्षरी केली.

·         अशा प्रकारे काश्मीर भारतात विलीन झाल्यानंतर भारतीय लष्कर काश्मीरच्या रक्षणासाठी पाठवले गेले.

·         या लष्कराने काश्मीरचा मोठा भाग घुसखोरांच्या हातून परत मिळवला. काही भाग मात्र पाकिस्तानच्या ताब्यात राहिला.

हैदराबाद मुक्तिग्राम :-

·         हैदराबाद संस्थानातील प्रजेमध्ये लोकजागृती करण्याचे आणि तेथील नागरिकांना मूलभूत अधिकारांसाठी लढण्याची प्रेरणा देण्याचे कार्य स्वामी रामानंद तीर्थ यांसारख्या नेत्यांनी केले.

·         राष्ट्रीय सभेच्या चळवळीचा प्रभाव हैदराबादमधील स्वातंत्र्यप्रिय जनतेवर पडला. स्वामी रामानंड तीर्थ, गोविंदराव नानल यांसारख्यांनी पुढाकार घेऊन 1938 साली 'हैदराबाद स्टेट काँग्रेस' या संघटनेची स्थापना केली होती.

·         निजामाने सदस्यांनी सत्याग्रहाची चळवळ केली. त्यात शेकडो विद्यार्थी सामील झाले.

·         1942 च्या 'छोडो भारत' चळवळीच्या काळात तशीच चळवळ हैदराबाद संस्थानातही झाली.

·         या चळवळीचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांच्याबरोबर गोविंदभाई श्रॉफ़, रामलिंग स्वामी, अनंत भालेराव, दिगंबरराव बिंदू इत्यादींनी केले.

·         भारताचे स्वातंत्र्य जसजसे जवळ येऊ लागले तसतशी हैदराबाद स्टेट कॉंग्रेसची चळवळ प्रखर होऊ लागली.

·         हैदराबाद संस्थान भारतात विलीन केले जावे असा ठराव जुलै 1947 मध्ये या संघटनेने केला. निजामाला मात्र स्वतंत्र राहायचे होते. त्याला पाकिस्तानची फुस होती.

·         संस्थानी प्रजेची भारतात विलीन होण्याची मागणी चिरडून टाकण्यासाठी कासीम रझवी याने निजामाच्या पाठिंब्याने रझाकार संघटना उभी केली.

·         कासीम रझवी हा धर्मांत व उद्दाम होता. त्याच्या साथीदारांनी हिंदूंवरच नव्हे तर लोकशाहीवादी चळवळीला पाठिंबा देणार्‍या मुस्लिमांवरही अनन्वित अत्याचार केले.

·         रझाकारांनी लुटालुट, जाळपोळ, सशस्त्र हल्ले यांचे सत्र सुरू केले. प्रतिकारासाठी प्रजेनेही शस्त्र हाती घेतले.

·         रझाकारांच्या वाढत्या अत्याचारांच्या बातम्या कानी येऊ लागल्या. त्यामुळे सर्वत्र लोकमत भडकू लागले.

·         निजामाशी सामोपचाराने बोलणी करण्याचा प्रयत्न भारत सरकार करत होते; परंतु निजाम दाद देत नव्हता.

·         अखेरीस भारत सरकारने 13 सप्टेंबर, 1948 रोजी निजामाविरुध्द पोलिस कारवाई सुरू केली. तीन दिवसांत निजाम शरण आला.

·         हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. संस्थानी प्रजेचा लढा यशस्वी झाला.

भारतातून फ्रेंच व पोर्तुगीज सत्ताचे उच्चाटन :-

·         भारत स्वतंत्र झाल्यानंतरही भारताचे काही भाग फ्रान्स व पोर्तुगाल यांच्या ताब्यात होते.

·         चंदनगर, पुदुच्चेरी, कारिकल, माहे, याणम यांवर फ्रान्सचे, तर गोवा, दीव व दमण, दादरा आणि नगर हवेली यांवर पोर्तुगालचे आधिपत्य होते.

·         तेथील भारतीय रहिवासी भारतात सामील होण्यास उत्सुक होते.

·         हे प्रदेश भारताचे घटक असल्यामुळे ते भारताच्या स्वाधीन करावेत अशी मागणी भारत सरकारने केली.

·         फ्रान्सने 1949 साली चंदनगरमध्ये सार्वमत घेतले. तेथील जनतेने भारताच्या बाजूने कौल दिला.

·         चंदनगर भारताच्या स्वाधीन करण्यात आले.

·         त्यानंतर फ्रान्सने भारताचे इतरही प्रदेश भारत सरकारच्या हाती सोपवले.

·          गोवा मुक्ती लढा :

·         पोर्तुगालने मात्र आपल्या ताब्यातील भारतीय प्रदेश हाती सोपवण्यास नकार दिला. तो प्रदेश मिळवण्यासाठी भारतीयांना संघर्ष करावा लागला.

·         पोर्तुगीज शासनाविरुध्द जनतेत जागृती घडवून आणण्याचे कार्य प्रथम डॉ. टी. बी. कुन्हा यांनी केले.

·         आपल्या लिखाणातून त्यांनी पोर्तुगिजांच्या शोषक कारभारावर कोरडे ओढले.

·         पोर्तुगिजांविरुध्द लढा देण्यासाठी लोकांना संघटित करण्याच्या हेतूने त्यांनी गोवा काँग्रेस समिती स्थापन केली.

·         1946 साली गोवा मुक्तीसाठी डॉ. राममनोहर लोहिया यांनी सत्याग्रहाची चळवळ सुरू केली. याच सुमारास गुजरातमधील दादरा व नगरहवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी आझाद गोमांतक दलाची स्थापना करण्यात आली होती.

·         2 ऑगस्ट, 1954 रोजी या दलाच्या तरूणांनी सशस्त्र हल्ला करून दादरा व नगरहवेलीचा प्रदेश पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त केला.

·         या हल्ल्यात विश्वनाथ लवंदे, नानासाहेब काजरेकर, सुधीर फडके इत्यादींनी भाग घेतला होता.

·         1954 सालापासून गोवा मुक्ती चळवळीला विशेष गती मिळाली. गोवा मुक्ती समिती स्थापन करण्यात आली.

·         या समितीने सत्याग्रहींच्या अनेक तुकडया गोव्यात पाठवल्या. त्यात सेनापती बापट, महादेवशास्त्री जोशी व त्यांच्या पत्नी सुधाताई तसेच सुधीर फडके, नानासाहेब गोरे इत्यादी नामवंतांनी भाग घेतला.

·         मोहन रानडे हे गोवा मुक्ती आंदोलनातील एक अग्रगण्य नेते होते. सत्याग्रहींवर पोर्तुगिजांनी अनन्वित अत्याचार केले. यामुळे भारतातील लोकमत अधिकच प्रक्षुब्ध झाले आणि लढा अधिक प्रखर झाला.

·         भारत सरकार पोर्तुगालशी सामोपचाराने वाटाघाटी करत होते. परंतु त्याला प्रतिसाद मिळेना. अखेरीस डिसेंबर 1861 मध्ये भारताचे सैन्य गोव्यात शिरले.

·         काही दिवसांतच पोर्तुगीज लष्कराने शरणागती पत्करली.

·         गोवा मुक्त झाला.

·         भारताच्या भूमीवरून साम्राज्यवादाचे पूर्णपणे उच्चाटन झाले.

महाराष्ट्रातील क्रांतिकारी नेते

 

विनायक दामोदर सावरकर :

·         जन्म - 1883 - भगूर, नाशिक

·         मृत्यू - मुंबई

·         'प्रयोपवेसा' या पद्धतीव्दारे मृत्यू

·         सावरकरांचे बंधु - गणेश (बाबाराव), नारायण

·         "हिंदू धर्मातील जात व्यवस्थेचे निर्मूलन करण्यात यावे आणि हिंदूधर्मातून परधर्मात गेलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात सामावून घ्यावे" - सावरकर

·         मित्रमेळा - 1900 - अभिनव भारत - 1904

·         'फ्रीइंडिया सोसायटीच्या' स्थापनेतही सावरकरांचा सहभाग

·         1910 मध्ये 'इंडिया House'संघटनेशी संबंध ठेवल्याच्या कारणावरून सावरकरांना अटक

·         दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा (50 वर्ष)

·         अंदमान कारागृहात 'हिंदुत्व' हे पुस्तक लिहले.

·         'हिंदू राष्ट्रवादाचे' प्रणेते

·         क्रांतिकारी दहशतवादाचे मार्ग सोडून देण्याच्या आधारावर त्यांची 1921 ला तुरुंगातून सुटका

·         'हिंदू महासभा' या संघटनेची स्थापना

·         1942 च्या चलेजाव चळवळीला सावरकरांचा विरोध

·         भारताच्या फाळणीला विरोध केला.

·         1905 परदेशी कपड्यांची होळी

·         'गरम दल' (Army of the Angry)या संघटनेची टिळकांच्या नेतृत्वाखाली स्थापना केली.

·         श्यामजीकृष्ण वर्मा च्या 'शिवाजी शिष्य वृत्ती' मूळे सावरकर इंग्लंडला गेले.

·         ग्रंथसंपदा - 'भारतीय ईतिहासातील सहा सोनेरी पाने',' माझी जन्मठेप',' हिंदुत्व',' 1857 चे स्वतंत्र युद्ध '.

·         सावरकरांनी 8 मे 1908 रोजी 'इंडिया हाऊस' येथे 1857 च्या भारतीय स्वातंत्र्य लढयास 50 वर्ष पूर्ण झाली म्हणून स्वातंत्र्य महोत्सव साजरा केला.

·         1911 ते 1924 - अंदमान कारागृहात सावरकर होते.

·         1924 ते 1937 - रत्नागिरी कारागृहात सावरकर रवानगी.

अनंद कान्हेरे :

·         बाबाराव सावरकरांच्या घरात बरीच आशेपार्ह कागतपत्रे सापडल्यामुळे बाबरावांनी सरकारने जन्मठेपची शिक्षा दिली.

·         या शिक्षेच्या विरोधात अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन ची हत्या केली.

शिवराम हरी राजगुरू :

·         जन्म - खेड 

सध्याचे - राजगुरूनगर

·         भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी ब्रिटिश पोलीस अधिकारी सॉडर्सची हत्या केली, लाहोर 1928

इतिहासातील महत्वाच्या घटना

क्र

घटनेचे नाव

वर्ष

विशेष

1.

प्लासीची लढाई

1757

सिराज उधौला व इंग्रज

2.

भारताकडे येण्याचा सागरी मार्ग

1498

वास्को-द-गामा

3.

वसईचा तह

1802

इंगज व पेशवे

4.

बस्कारची लढाई

1764

शुजा उधौला, मिर कासीम, मुघल बादशाह, शहा आलम व इंग्रज

5.

सालबाईचा तह

1782

इंग्रज व मराठे

6.

तिसरे इंग्रज-मराठा युद्ध

1818

दुसर्‍या बाजीरावचा पराभव, मराठेशाहीचा शेवट

7.

अलाहाबादचा तह

1765

बंगालमध्ये जनरल लॉर्ड वेलल्सी

8.

तैनाती फौज (सुरवात)

1797

गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलल्सी

9.

दुहेरी राज्यव्यवस्था

1765

रॉबर्ट क्लाईव्ह (बंगाल)

10.

रेग्युलेटिंग अॅक्ट

1773

बंगालच्या गव्हर्नरला 'गव्हर्नर जनरल' हा किताब देण्यात आला.

11.

सतीबंदीचा कायदा

1829

बेटिंग

12.

भारतात इंग्रज सत्तेची सुरवात

1835

लॉर्ड बेटिंग, लॉर्ड मेकॉले

13.

रेल्वेचा प्रारंभा (मुंबई ते ठाणे)

1853

लॉर्ड डलहौसी

14.

भारतातील पहिली कापड गिरणी

1853-54

काउसजी

15.

पहिली ताग गिरणी

1855

बंगालमधील रिश्रा

16.

विधवा पुनर्विवाह कायदा

1856

लॉर्ड डलहौसी

17.

विद्यापीठांची स्थापना

1857

मुंबई,मद्रास,कोलकाता

18.

1857 चा कायदा

1857

भारतमंत्री पदाची निर्मिती

19.

राणीचा जाहिरनामा

1 नोव्हेंबर 1858

लॉर्ड कॅनिगने अलाहाबाद येथे वाचून दाखवला

20.

वुडचा खलिता

1854

वुड समितीने शिक्षणविषयक शिफारशी केल्या म्हणून त्यास भारतीय शिक्षणाची सनद असे म्हणतात

21.

1861 चा कायदा

1861

भारतीयांना केंद्रीय आणि विधिमंडळात प्रश्न विचारण्याची परवानगी

22.

दख्खनचे दंगे

1875

महाराष्ट्रातील नगर व पुणे जिल्ह्यातील सावकरांविरुद्ध केलेले आंदोलन

23.

शेतकर्‍याचा उठाव

1763 ते 1857

बंगालमध्ये सन्याशांच्या व फकिरांच्या नेतृत्वाखाली झाला</td>

24.

हिंदी शिपायांचा उठाव

1806

वेल्लोर येथे झाला

25.

हिंदी शिपायांचा उठाव

1824

बराकपूर

26.

उमाजी नाईकांना फाशी

1832

27.

संस्थाने खालसा

1848 ते 1856

डलहौसी (संबळपुर, झाशी, अयोध्या इ.)

28.

मंगल पांडे याने मेजर हडसनवर गोळी झाडली

29 मार्च 1857

बराकपूरच्या छावणीत

29.

1857 च्या उठावाची सुरवात

10 मे 1857

'हर हर महादेव, मारो फिरंगी का' अशी घोषणा मेरटच्या छावणीतून सुरू

30.

भिल्लाचा उठाव

1857

खानदेशात कझागसिंग यांच्या नेतृत्वाखाली

31.

गोंड जमातीचा उठाव

-

ओडिशा

32.

संथाळांचा उठाव

-

बिहार

33.

रामोशांचा उठाव

-

उमाजी नाईकांच्या नेतृत्वाखाली

34.

गडकर्‍याचा उठाव

-

कोल्हापूर

35.

कोळी व भिल्लाचा उठाव

-

महाराष्ट्र

36.

1857 च्या उठावाचे नेतृत्व

-

बहादुरशाह

37.

भारतातील पहिली कामगार संघटना

1890

नारायण मेघाजी लोखंडे

38.

स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा

1882

लॉर्ड रिपन

39.

हंटर कमिशन

1882

भारतीय शिक्षणविषयक आयोग

40.

भारतीय वर्तमानपत्रावर बंदी घातली

1878

लॉर्ड लिटन

41.

भारतीय वर्तमान पत्रावरील बंदी उठवली

1882

लॉर्ड रिपन

 

महत्वाची आंदोलने व चळवळी

असहकार आंदोलन :-

·         भारतीय लोकमताच्या दडपणामुळे ब्रिटिश सरकारने जालियनवाला बाग हत्याकांनडाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या हंटर आयोगाने जनरल डायरविरूध्द कोणतीही ठोस कारवाई सुचवली नाही.

·         इंग्लडमध्ये डायरच्या कृत्याचे समर्थ नच केले गेले. या घटनांमुळे भारतीय जनतेने ब्रिटिश सरकारविरूध्दचा आपला लढा अधिक तीव्र केला.

खिलाफत चळवळ :-

·         पहिल्या महायुध्दानंतर तर्कस्तानवर कठोर तह लादला गेल्याने प्रक्षुब्ध झालेल्या भारतीय मुस्लीम समाजाने खिलाफत आंदोलन उभारले.

·         राष्ट्रीय सभेने खिलाफत चळवळीला दिलेला पाठिंबा आणि मुस्लिमांनी राष्ट्रीय सभेच्या आंदोलनास दिलेला पाठिंबा यामुळे हिंदू-मुस्लीम ऐक्य साधण्यात गांधीजीना यश मिळाले.

असहकार चळवळ :-

·         1920 सालच्या नागपूर अधिवेशनात राष्ट्रीय सभेने गांधीजींच्या असहकाराच्या चळवळीच्या कार्यक्रमास मान्यता दिली.

·         त्यात पुढील बाबींचा समावेश होता.

(1) सरकारी नोकर्‍या व पदव्या यांचा त्याग करणे.

(2) सरकारी सभा समारंभावर बहिष्कार टाकणे.

(3) सरकारी शाळा- महाविदयांलयातून मुलांना काढून घेऊन त्यांना राष्ट्रीय शिक्षण संस्थांत दाखल करणे

(4) सरकारी कोर्ट्सकचेर्‍यांवर बहिष्कार घालणे.

(5) प्रांतिक निवडणुकांवर बहिष्कार टाकणे.

(6) परदेशी मालावर बहिष्कार टाकणे व स्वदेशी मालाचा वापर करणे.

(7) दारूबंदीचा प्रचार व दारूच्या दुकानांसमोर निदर्शने करणे.

·         असहकार आंदोलनास भारतीय जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

·         शासनाने दडपशाहीचे धोरण स्वीकांरताच गांधीजींनी सविनय कायदेभंगाचे आंदोलन सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला.

·         चौरीचौरा येथे चळवळीला हिंसक वळण लागल्याने ऐन जोमात आलेली असहकारची चळवळ मागे घेण्याचा निर्णय गांधीजीनी 5 फेब्रुवारी, 1922 रोजी घेतला.

विधायक कार्यक्रम :-

·         गांधीजीनी असहकाराच्या चळवळीला विधायक कार्यक्रमाची जोड दिली.

·         त्यामुळे राष्ट्रीय चळवळ ग्रामीण भागात पोचली व तिला जनाधार प्राप्त झाला.

स्वरात्य पक्ष :-

·         पंडित मोतीलाल नेहरू, बॅ. चित्ता रंजन दास इ. ज्येष्ठ नेत्यांनी कायदेमंडळात जाऊन ब्रिटिश शासनाशी लढा देण्याच्या उददेशाने 1922 साली स्वराज्य पक्षाची स्थापना केली.

·         1923 च्या प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुकीत या पक्षाला बर्‍यापैकी यश मिळाले. यात शासनाने आडमुठेपणाने धोरण स्वीकारल्याने अल्पावधीत त्यांचा भाषांतरांवरूनरमनिरास झाला.

यशापयश :-

·         असहकार आंदोलनाने भारतीय जनतेत राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण केली.

·         लाखोंच्या संख्येत सामान्य लोक निर्भयपणे असहकार आंदोलनात सहभागी झाले.

·         या आंदोलनाद्वारे हिंदू-मुस्लीम ऐक्य दृढ झाले.

·         सत्याग्रहाच्या अभिनव मार्गाने ब्रिटिश साम्राज्यवादी राजवटीचा पाया कमकुवत करण्यात गांधीजी यशस्वी झाले.

चलेजाव आंदोलन (1942) :-

·         क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम 6 जुलै 1942 रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठक 'चलेजाव' ठराव पास.

·         मुंबईत 7 ऑगस्ट 1942 रोजी कॉंगे्रसचे खुले अधिवेशन सुरू. (मौलाना आझाद अध्यक्ष) 8 ऑगस्ट 1942 रोजी चलेजाव ठराव मंजूर.

·         9 ऑगस्ट रोजी पहाटे नेत्यांची धरपकड.

·         गांधीजी आगाखान पॅलेस पुणे येथे बंदीवान.

·         कार्यकारिणी सदस्य अहमदनगर तुरूंगात ही एकमेव नेतृत्वविरहित चळवळ. -

* प्रती सरकारे सातारा (नाना पाटील), तालचेर (ओरिसा), बलिया (उत्तर प्रदेश) इ. बंगालात तामलुक जतिया सरकार दिनापुर येथे.

* या राष्ट्रीय सरकारानी कायदा, सुव्यवस्था राखली. आरोग्य, शिक्षण, शेती, पोस्टल व्यवस्था सांभाळली.

* सुरूवातीला शहरी भागात अधिक जोर नंतर खेडयात.

*या काळात भूमिगत चळवळी जयप्रकाश नारायण व रामनंदन मिश्रा हजारीबाग जेलमधून निसटले, भूमिगत चळवळ सुरू, मुंबईत समाजवाद्यांच्या अरूणा असफअलींच्या नेतृत्वाखाली भूमिगत कारवाया.

* काँग्रेस रेडिओ केंद्र, उषा मेहता, शाळा-कॉलेज स्त्री-पुरूष कामगार, जनआंदोलन.

व्यापारी व भांडवलदार सामील नाहीत. युध्दकाळात त्यांचा मोठा फायदा.

* मुस्लीम लीग दूर राहिली. हिंदु महासभेने तिरस्कार केला. कम्युनिस्टांनी पाठिंबा दिला नाही.

* भारतीय संस्थानिकांची इंग्रजांना मदत. सी. राजगोपालाचारी या सारखे काँग्रेसी नेते बाजूला राहिले.

* निश्चित स्वरूप व कार्यक्रमाचा अभाव, हिंदी नोकरांची एकनिष्ठता, भीषण उपासमार, हिंदी लोकातील फूट, सरकारची दडपशाही यामुळे चलेजाव चळवळीला अपयश.

* स्वातंत्र्यासाठी जनता प्राणाची बाजी लावण्यास सिध्द आहे हे स्पष्ट झाले.

* भारताचे स्वातंत्र दृष्टीपथात आले.

छोडो भारत चळवळ -

·         क्रिप्स योजनेच्या अपयशानंतर भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आणून स्वातंत्र्य प्राप्त करण्याच्या उद्देशाने छोडो भारत चळवळ सुरू करण्याचा निर्णय राष्ट्रीय सभेने मुंबई येथे 8 ऑगस्ट, 1942 रोजी घेतला.

·         ही चळवळ दडपण्याचा ब्रिटिश शासनाने अयशस्वी प्रयत्न केला संपूर्ण देशभर या चळवळीचे लोण पसरले.

·         समाजवादीगटाच्या नेत्यांनी भूमिगत राहून 1942 च्या लढयाचे प्रभावी नेत्रृत्व केले.

·         महाराष्ट्र्रात सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटिल यांनी प्रतिसरकार स्थापन करून ब्रिटिश राजवटीच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले.

·         देशात अन्यत्रही अशी प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली.

·         अशा प्रकारे 1942 चे जनआंदोलन अत्यंत यशस्वी ठरले.

नेताजी सुभाष चंद्र बोस -

·         भारताच्या स्वातंत्र्यचळवळीतील एक सर्वाधिक लोकप्रिय नेते सुभाषचंद्र बोस होत.

·         1938 1939 साली राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली.

·         दुसरे महायुध्द सुरू झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय चळवळ प्रखर करण्याचा आणि परकीयांची (म्हणजेच ब्रिटनच्या शत्रूराष्ट्रांची) मदत घेऊन स्वातंत्र्य प्राप्त करण्यात यावे, असा विचार मांडला फॅसिस्ट राष्ट्रांना अन्य ज्येष्ठ नेत्यांचा प्रखर विरोध असल्याने, सुभाषचंद्र बोस यांचे त्यांच्याशी मतभेद झाले.

·         त्याची परिणती म्हणजे नेताजींनी दिलेला राष्ट्रीय काॅंग्रेसचा राजीनामा आणि फॉरर्वड ब्लॉक या पक्षाची केलेली स्थापना ब्रिटिशांविरूध्द उठाव करण्याच्या त्यांच्या प्रचारामुळे सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले, नजरकैदेतून शिताफिने निसटून ते प्रथम जर्मनीला आणि नंतर जपानला गेले.

आझाद हिंद सेना -

·         ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रासबिहारी बोस यांनी 1942 साली जपानच्या सहकार्याने आझाद हिंद सेने ची स्थापना केली.

·         नेताजींनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करावे, अशी रासबिहारी बोस यांनी विनंती केल्याने त्यांनी त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले.

·         नेताजींनी 1943 आझाद हिंद सरकार ची स्थापना केली. आणि अमेरिका व इंग्लडविरूध्द युदध घोषित केले.

·         आझाद हिंद सेनेने भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

·         18 ऑगस्ट 1945 रोजी नेताजींचा अपघाती मृत्यू झाला व या सशस्त्र संघर्षाच्या पर्वाची समाप्ती झाली.

·         आझाद हिंद सेनेच्या अधिकारी व सैनिकांवर राजद्रोहाच्या आरोपाखाली लष्करी न्यायालयात खटले भरण्यात आले.

·         लोकक्षोभामुळे त्यांना देण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेची अंमलबजावणी रदद् करण्यात आली.

भारतीय नौदलाचा उठाव -

·         आझाद हिंद सेनेपासून प्रेरणा घेऊन भारतीय सैनिकांना दिल्या जाणार्‍या भेदभावी वागणुकीच्या निषेधार्थ फेब्रुवारी 1946 मध्ये नौदलातील सैनिकांनी मुंबई व कराची येथे ब्रिटिशविरोधी उठाव केला.

·         अखेरीस सरदार पटेल यांच्या मध्यस्थीने या सैनिकांना शरणागती स्वीकारावी लागली.

·         या घटनेमुळे यात भारतीय सैन्याच्या आधारे भारतावर यापुढे राज्य करता येणार नाही, याची ब्रिटिशांना जाणीव झाली.

मानवी जीवनाचा इतिहास

मानवाची उत्क्रांती -

·         एकपेशीय सजीवापासून ते मानवाच्या उत्पत्तीपर्यंत निसर्गाला कोट्यावधी वर्षे लागले.

·         उत्क्रांतीच्या ओघात माकडासारखा प्राणी जन्माला आला. हा प्राणी एप म्हणून ओळखला जात असे. त्याला शेपूट नव्हते.

·         त्याचे डोके माकडापेक्षाही मोठे होते. त्याच्या पाठीत बाक होता आणि हा प्राणी दोन पायावर चालत असे. त्याचे हात गुडग्यापर्यंत लांब होते.

·         त्याच्या भुवयावर जाड केस होते व संपूर्ण शरीरभर केस होते हा प्राणी म्हणजे आदिमानव होय. त्यानंतरच्या काळातील मानवी विकासाचे होमो इरेक्टस आणि होमो सेपिअस असे 2 टप्पे मानले जातात.

·         होमो सेपिअस म्हणजे बुद्धिमान मानव.

·         मानवी मानवी विकासाच्या या टप्पात मानवाला अग्नीचा उपयोग माहिती होता. त्यानंतरच्या काळात त्याने दगडी हत्यारे घडविण्यास सुरुवात केली.

·         हा काळ अश्मयुग म्हणून ओळखला जातो. या काळाचे पुराश्मयुग व नावाश्मयुग असे दोन काळ पडतात.

पुराश्मयुग -

·         आदिमानव आपली उपजीविका करण्याकरिता कंदमुळे आणि कच्चे मांस खात असे.

·         जेव्हा त्यास नुसत्या हाताने मांस सोलणे अवघड आहे असे, कळल्यानंतर त्याने दगडापासून हत्यारे तयार करण्यास सुरुवात केली.

·         ज्या काळात मानवाने दगडापासून हत्यारे तयार करण्यास सुरुवात केली. त्यावेळेस सुरूवातीला हे हत्यारे ओबडधोबड होती.

·         लांबवर दगड फेकण्याकरिता त्याने दगडाला आकार देण्यास सुरवात केली.

·         दगडाला योग्य आकार देण्याकरिता त्याने दगडाला छिलके पडण्यास सुरुवात केली.

·         या संकल्पनेमधून सुबक आकाराची हत्यारे आकारास आली.

नवाश्मयुग -

·         नवाश्मयुगामध्ये मानवाला शेती व पशूपालनाची कला अवगत झाली. बी टाकल्यानंतर झाड तयार होते.

·         हे ज्ञान त्यास कालांतराने त्यास मिळाले आणि यामधून शेती करण्याची आणि शेतीकरण्याकरिता पशुचा वापर करण्याची कल्पना त्यास सुचली.

·         या कल्पनेमधून मानवाच्या जीवनात शेती आणि पशुपालन व्यवसाय सुरू होवून मानवी संस्कृतीच्या विकासाकडे मानव वळत गेला.

·         शेतीचा शोध - जमिनीवर सांडलेले धान्याचे कण मातीत रुजतात आणि त्यापासून रोपे तयार होवून त्यास कणसे लागतात. असे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने धान्य पेरण्यास सुरुवात केली आणि त्या संकल्पनेतून शेतीचा शोध लागला.

·         पशुपालन - मानवाला शिकारीकरिता आणि घराची राखण करण्याकरिता कुत्रा उपयुक्त ठरू लागला. या घटनेमुळे त्यास आपल्या मदतीकरिता प्राण्याचा उपयोग होतो. असा शोध लागला. या शोधातून मानव मानवी शक्तीऐवजी प्राण्यांचा उपयोग करून शेती करू लागला.

ग्रामीण वस्तीचा विकास -

·         मानवाच्या जीवनातील शेतीचा शोध हा त्याला स्थिरता आणण्यास उपयोगी ठरला.

·         शेतीचा शोध लागल्यामुळे त्याची भटकंती संपवून स्थिर जीवनास सुरुवात झाली.

·         गांव व वसाहती - शेतीच्या शोधामुळे त्याला एकाच ठिकाणी अन्न मिळू लागले. त्यामुळे त्याच्या जीवनात स्थिरता येवून तो घर करून राहू लागला. शेतीच्या कामाकरिता त्यास इतरांची गरज भासू लागली. त्यामुळे एकमेकास सहाय्य करण्यार्‍या माणसाचा गट तयार होवून ते एकत्र राहून एकमेकास संरक्षण देवू लागते. त्यामधून ग्रामीण वस्तीचा विकास झाला. आणि वस्तीचे रूपांतर गावामध्ये होवू लागले.

·         नागरी संस्कृतीच उदय - स्थिर झालेल्या समाजव्यवस्थेला गतीमानता आणण्यामध्ये चाकाचा शोध हा क्रांतिकारक ठरला. नवाश्मयुगामध्ये चाकाचा शोध लागला असावा असे म्हटले जाते. मानवास उंचावरून घरंघळत येणार्‍या ओंडक्यावरुन चाकाची संकल्पना सुचली. चाकाचा सर्वात प्रथम वापर कुंभाराने भांडी तयार करण्याकरिता केला असे म्हटले जाते. चाकाच्या शोधामुळे वाहतुकीला सुरवात झाली. जगातील बहुतांशी संस्कृती नदी काठच्या प्रदेशात विकसित झाली आहे. त्यामध्ये भारतातील सिंधु संस्कृती, आशिया खंडातील तैग्रिस, युफ्रेटिस व चीनची संस्कृती, नाईल नदीच्या खोर्‍यात विकसित झालेली इजिप्तची संस्कृतीचा विकास नदयाच्या प्रदेशातच झाला आहे.  

 

No comments:

Post a Comment

Most View

Post Top Ad

Your Ad Spot

Pages